- शीलेश शर्मानवी दिल्ली : नागरी उड्डयन मंत्रालय २५ मेपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू करीत असून, आंतरराष्ट्रीय उड्डाणांचीही तयारी करत आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा नेमकी कधी सुरू होणार, हे अजून स्पष्ट नाही.उड्डयन मंत्रालयाचे अधिकारी या उड्डाणांसाठीची योजना तयार करत आहेत. आधी देशांतर्गत विमान उड्डाणांचे परिणाम बघितले जातील म्हणजे आंतरराष्ट्रीय उड्डाणांची सेवा देताना काही अडचणी येऊ नयेत. नागरी उड्डयन मंत्री हरदीप पुरी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, त्यांनी आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा सुरू करायच्या आधी खासगी क्षेत्रातील विमान सेवेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करावी.
आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार? उड्डाणांची केली जात आहे तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 06:01 IST