शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा दोन मराठी चित्रपट, ८ लघुपटांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 14:00 IST

गोव्यात २0 नोव्हेंबरपासून ४९ वा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव होत आहे.

नवी दिल्ली : गोव्यात २0 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या ४९ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवासाठी यंदा २ मराठी चित्रपटांची आणि सर्वाधिक ८ मराठी लघुचित्रपटांची निवड करण्यात आलेली आहे. विविध भाषेतील एकूण २२ चित्रपट आणि २१ लघुपट या विभागात दाखविण्यात येणार आहेत.

इंडियन पॅनोरमा विभागात पुण्याच्या निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित धप्पा आणि प्रतिमा जोशी दिग्दर्शित आम्ही दोघी हे दोन मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.

दिग्दर्शक शाही एन करुन यांच्या ओएलयू या मल्याळम चित्रपटाने इंडियन पॅनोरामाची सुरुवात होणार आहे. या विभागात मुख्य प्रवाहातील पद्मावत, टायगर जिंदा है, राजीसह सूजित सरकारचा आॅक्टोबर व कामाख्य नारायण सिंगचा भोर हे हिंदी चित्रपट दाखविण्यात येत आहेत. नागाश्विनचा गाजलेला महानटी हा तेलगू चित्रपटही या विभागात दाखविण्यात येणार आहे. याशिवाय पाच बंगाली, सहा मल्याळी, चार तमिळ, एक तेलगू, एक तुलू, एक लद्दाखी, एक जस्सारी भाषेतील चित्रपटांचाही समावेश आहे.

लघुपटांसाठी चक्क ८ मराठी भाषेतील लघुपट निवडण्यात आले आहेत. याचा प्रारंभही आदित्य जांभळे दिग्दर्शित खरवस या मराठी लघुपटानेच होणार आहे. याशिवाय कोल्हापूरच्या मेधप्रणव बाबासाहेब पोवार यांचा हॅपी बर्थ डे, नितेश पाटणकरांचा ना बोले वो हराम, प्रसन्ना पोंडेंचा सायलेंट स्क्रीम, सुहास जहागिरदार यांचा येस आय अ‍ॅम माऊली, शेखर रणखांबे यांचा पॅम्पलेट, गौतम वझे यांचा आई शपथ, आणि स्वप्नील कपुरे यांचा भर दुपारी या लघुपटांचा या विभागात दाखविण्यात येणार आहेत.

लघुपटांमध्येही चार इंग्लिश, तीन हिंदी, तीन मल्याळी, एक बंगाली, एक भोजपुरी आणि एक उरिया भाषेतील लघुपट दाखविण्यात येणार आहेत. चित्रपट दिग्दर्शक, पटकथाकार राहुल रवैल यांच्या अध्यक्षेतखालील १३ सदस्यांच्या चित्रपट ज्यूरींनी या महोत्सवामध्ये इंडियन पॅनोरमा विभागासाठी एकूण २२ चित्रपटांची निवड केली आहे, तर २१ लघुपटांचा समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :IFFIइफ्फीgoaगोवा