शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
6
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
7
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
8
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
9
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
10
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
11
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
12
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
13
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
14
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
15
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
16
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
17
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
18
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
19
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
20
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू

Article 370: काश्मीर खरंच शांत? संरक्षण दलांच्या कागदपत्रांमधून वेगळेचं सत्य समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 15:51 IST

कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीर शांत असल्याचा सरकारचा दावा

नवी दिल्ली: कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा मोदी सरकारकडून करण्यात आला. अद्यापही सरकार आपल्या दाव्यावर ठाम आहे. मात्र संरक्षण दलांकडे असणाऱ्या कागदपत्रांमधून वेगळेची माहिती समोर आली आहे. कलम ३७० काढून टाकण्यात आल्यानंतर काश्मीरमध्ये दगडफेकीच्या ३०६ घटना घडल्याची आकडेवारी संरक्षण दलांच्या कागदपत्रांमधून पुढे आली आहे. 'न्यूज१८'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय ऑगस्टमध्ये संसदेनं घेतला. या ऐतिहासिक निर्णयाला दोन महिने झाले आहेत. या कालावधीत काश्मीरमध्ये दगडफेकीच्या ३०६ घटना घडल्या आहेत. म्हणजेच काश्मीरात प्रत्येक दिवशी सरासरी पाच दगडफेकीचे प्रकार घडत आहेत. कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर झालेल्या दगडफेकीच्या घटनांमध्ये सुरक्षा दलांचे जवळपास १०० जवान जखमी झाले. यापैकी ८९ जवान निमलष्करी दलाचे आहेत. काश्मीरमधील बहुतांश भागात शांतता असल्याचा दावा जम्मू काश्मीर प्रशासनानं केला. २०१६ मध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वाणीचा सुरक्षा दलांनी खात्मा केला. त्यानंतर काश्मीर पेटलं होतं. त्या तुलनेत सध्याची काश्मीरमधील स्थिती अतिशय चांगली असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. २०१९ च्या पहिल्या सहा महिन्यात दगडफेकीच्या केवळ ४० घटना घडल्या होत्या, असंदेखील प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. ६ ऑगस्टला संसदेत जम्मू काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यापूर्वी काश्मीरमधील बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली होती. कलम ३७० काढून टाकण्याचा निर्णय होताच काश्मीरमधील अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काश्मीरमधील फोन आणि इंटरनेट सेवादेखील बंद करण्यात आली. याशिवाय जवळपास ४ हजार लोकांना ताब्यात घेण्यात आलं. काश्मीरमधील अनेक प्रमुख नेत्यांना या काळात नजरकैदेत ठेवण्यात आलं.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370