शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आंतरधर्मीय विवाह नाेंदणी : धर्मांतराला मान्यतेची गरज नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 06:22 IST

अलाहाबाद उच्च न्यायालय, १७ जाेडप्यांचे विवाह नाेंदणी करण्याचे निर्देश

ठळक मुद्देयाचिका निकाली काढताना न्या. सुनीत कुमार यांनी सांगितले, उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतरविराेधी कायदा आंतरधर्मीय विवाहांना प्रतिबंध घालत नाही.

अलाहाबाद : आंतरधर्मीय विवाहाच्या नाेंदणीसाठी जाेडप्यांच्या धर्मांतराच्या परवानगीची प्रतीक्षा केली जाऊ शकत नाही, असे सांगून उत्तर प्रदेशातील १७ आंतरधर्मीय विवाहांची नाेंदणी करण्याचे निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले आहेत. १७ जाेडप्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन विवाह नाेंदणीसाठी याचिका दाखल केली हाेती. स्वत:च्या इच्छेनुसार लग्नानंतर धर्मपरिवर्तन केले असून, आईवडील व इतर नातेवाइकांकडून जीवाला धाेका असल्याचे त्यांनी म्हटले हाेते. याकडे सरकारी यंत्रणेने डाेळेझाक केल्याचे त्यांचे म्हणणे हाेते. 

याचिका निकाली काढताना न्या. सुनीत कुमार यांनी सांगितले, उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतरविराेधी कायदा आंतरधर्मीय विवाहांना प्रतिबंध घालत नाही. मात्र, अशा लाेकांचा छळ हाेऊ शकताे. अशा स्थितीत विवाह नाेंदणी अधिकारी किंवा जिल्हा प्रशासनाला लग्नाची वैधता ठरविण्याचा अधिकार नाही. त्यामुळे या जाेडप्यांच्या विवाहांची नाेंदणी करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. समान नागरी कायदा प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित आहे, असे सांगून न्यायालयाने कलम ४४ ची अंमलबजावणी करण्यासाठी समिती किंवा आयाेगाची स्थापना करण्याचे निर्देशही न्यायालयाने केंद्र सरकारला दिले.उत्तर प्रदेशच्या नव्या कायद्यानुसार बेकायदेशीर धर्मांतर राेखण्यासाठी ६० दिवसांची पूर्वनाेटीस देणे आवश्यक आहे. धर्मांतरामागील कारणे शाेधण्यासाठी चाैकशी झाल्यानंतरच परवानगी देण्यात येईल. 

समान नागरी कायद्याबाबत न्यायालयाची टिप्पणीn    या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने समान नागरी कायद्याबाबत महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायालयाने सांगितले, भारतातील नागरिकांसाठी समान नागरी संहिता सुरक्षित करेल. आजच्या काळात याची नितांत गरज आहे.n    डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७५ वर्षांपूर्वी म्हटल्याप्रमाणे, अल्पसंख्याक समाजातील नागरिकांनी व्यक्त केलेली आशंका आणि भीती लक्षात घेऊन ताे ऐच्छिक करता येणार नाही. संसदेने सिंगल फॅमिली काेड विचारात घेणे ही काळाची गरज आहे. जेणेकरून आंतरधर्मीय लग्न करणाऱ्या जाेडप्यांना संरक्षण मिळू शकेल. 

टॅग्स :marriageलग्नCourtन्यायालय