शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
2
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
5
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
6
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
7
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
8
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
9
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
10
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
11
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
12
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
13
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
14
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
15
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
16
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
17
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
18
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
19
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

मोदी लाटेच्या भरवशावर राहू नका, लोक नाराज आहेत; 'त्या' अहवालानं भाजपची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 18:48 IST

अहवालानं भाजप, संघाचं टेन्शन वाढलं; भाजप नेतृत्त्वाकडून मंथन सुरू

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. मात्र केंद्र सरकार मतदारसंघांची पुनर्रचना केल्यानंतरच निवडणूक घेईल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्याची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षानंदेखील निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मात्र बुद्धिजीवी वर्गानं दिलेल्या इशाऱ्यानं भाजपची चिंता वाढली आहे.

भाजपनं जम्मूच्या आर एस पुरामध्ये बुद्धिजिवींची बैठक बोलावली होती. त्यात झालेल्या मंथनानं भाजपची चिंता वाढली आहे. महागाई, बेरोजगारीमुळे पक्षाविरोधात सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे, असं बुद्धिजिवींनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं. काश्मीर खोऱ्यात मोदी लाटेच्या जीवावर पुढे जाऊ नका, असंदेखील बुद्धिजिवींनी सांगितलं.'बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है', चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा सत्ता स्थापन करण्याची तयारी भाजपनं सुरू केली आहे. जम्मू-काश्मीर संवेदनशील भाग असल्यानं भाजपनं आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत मोदींचा करिश्मा चालणार नाही असा बुद्धिजिवींचा अंदाज आहे. त्यांनी दिलेला अहवाल नुकताच दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पोहोचला. त्यामुळे भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चिंतादेखील वाढली आहे.'मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाजा वाटत नाही'; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

जम्मू-काश्मीरमध्ये तगडा चेहरा शोधण्याचा प्रयत्न भाजप नेतृत्त्वाकडून सुरू आहे. त्यासाठी भाजप इतर पक्षातील नाराजांवर नजर ठेवून आहे. 'जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीत भाजपनं मोदी लाटेच्या भरवशावर राहू नये. कारण लोकांच्या मनात सरकारच्या धोरणांबद्दल नाराजी आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ झाल्याची झळ सर्वसामान्यांना बसत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात नाराजी आहे,' असं बुद्धिजिवींना त्यांच्या अहवालात नमूद केलं आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघJammu Kashmirजम्मू-काश्मीर