शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

"टेकऑफ होण्यापूर्वीच झालं क्रॅश लॅडिंग"; १९ वर्षांच्या संसारानंतर सुप्रीम कोर्टात घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 13:46 IST

ट्रायल कोर्टात पतीला पत्नीपासून घटस्फोट मिळाला परंतु पत्नीने त्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली.

नवी दिल्ली – लग्नाच्या १९ वर्षानंतर सुप्रीम कोर्टाने एका जोडप्याला घटस्फोट दिला आहे. कारण लग्नाच्या दिवसापासून आतापर्यंत एकही दिवसं जोडपं एकत्र राहिलं नाही. लग्नाच्या सुरुवातीपासूनच हे संबंध संपले होते आणि टेकऑफच्या वेळीच क्रॅश लँडिंग झालं होतं. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने कलम १४२ च्या विशेषाधिकार वापरत हा निर्णय घेत लग्न झालेल्या जोडप्याच्या घटस्फोटाला परवानगी दिली आहे.  न्या. संजय किशन कौल आणि न्या. ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने तामिळनाडूतील एका जोडप्याच्या खटल्याचा निकाल देताना ही टीप्पणी केली आहे.

२००२ मध्ये या जोडप्याचं लग्न झालं होतं. दोघांमध्ये तडजोड होण्याचे अनेक प्रयत्न केले परंतु ते अयशस्वी ठरले. महिलेच्या इच्छेविरोधात हे लग्न झाल्याचा याचिकाकर्ते पतीचा आरोप होता. लग्न होताच ती मंडपातून निघून गेल्याचं त्याने सांगितले. खंडपीठाने महिलेने याचिकाकर्त्यावर अनेक खटले दाखल केल्याचं पाहिलं. तसेच कॉलेजच्या अधिकाऱ्यांकडेही महिलेने पतीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. या खटल्यावेळी पतीने सांगितले की, माझं आणि माझ्या पत्नीचे लग्न २००२ मध्ये झालं होतं. लग्नासाठी तिच्या आईवडिलांनी तिची परवानगी घेतली नव्हती असं पत्नीला वाटायचे. त्यामुळे ती लग्न झाल्यानंतर तात्काळ मंडपातून उठून निघून गेली. लग्नाच्या काही महिन्यांनी पत्नीने माझ्याविरोधात तक्रार दाखल केली. इतकचं नाही तर माझ्या ऑफिसमध्येही अनेक पत्र पाठवून माझ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर पतीने न्याय मिळवण्यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला.

ट्रायल कोर्टात पतीला पत्नीपासून घटस्फोट मिळाला परंतु पत्नीने त्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली. हायकोर्टाने घटस्फोटाचा निर्णय रद्द केला त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहचलं. या प्रकरणाची दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने सांगितले की, लग्नाच्या सुरुवातीला दोघांचे नातं संपलं होतं. दोन्ही पक्षाकडून समाधानकारक तोडगा काढण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. पती अथवा पत्नीचे सातत्याने आरोप-प्रत्यारोप आणि खटलेबाजी क्रूरतेसारखी आहे. त्यामुळे घटस्फोटासाठी हे कारणीभूत आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हंटलं आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयDivorceघटस्फोट