शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चारा खाणाऱ्यांकडून अवमान; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लालूप्रसाद यादव यांच्यावर नाव न घेता टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 07:50 IST

एस. पी. सिन्हा लोकमत न्यूज नेटवर्क भागलपूर : बिहारमध्ये जंगलराज आणणारे आता महाकुंभ मेळ्यावर अवमानकारक वक्तव्ये करत असल्याची टीका ...

एस. पी. सिन्हालोकमत न्यूज नेटवर्कभागलपूर : बिहारमध्ये जंगलराज आणणारे आता महाकुंभ मेळ्यावर अवमानकारक वक्तव्ये करत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख व माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली. मोदी यांनी सांगितले की, आपल्या परंपरा, श्रद्धा यांच्याविषयी जंगलराजवाल्या लोकांच्या मनात द्वेष आहे. महाकुंभ मेळा हा भारताच्या ऐक्याचा सर्वांत मोठा उत्सव आहे. तिथे पवित्र स्नान करणाऱ्यांची संख्या युरोपच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. बिहारमधूनही अनेक लोक या मेळ्यात जात आहेत, असेही ते म्हणाले. 

मोदी यांनी सांगितले की, जंगलराज आणणारे अयोध्येतील राममंदिराच्या विरोधातही होते. यांना बिहारची जनता कधीच माफ करणार नाही. नवी दिल्ली रेल्वेस्थानकावरील चंगेराचेंगरीसंदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा राजीनामा मागताना लालूप्रसाद म्हणाले होते की, महाकुंभमेळा म्हणजे नेमके आहे तरी काय? सारा असमंजसपणाचा खेळ आहे. त्या वक्तव्याच्या अनुषंगाने पंतप्रधानांनी अप्रत्यक्षरीत्या टीका केली. (वृत्तसंस्था)

शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले २२ हजार कोटी देशभरातील शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १९ वा हप्ता जारी केला. त्याचे ९.८० कोटी लाभार्थी असून, त्यांच्या खात्यात २२ हजार कोटी रुपये वळते करण्यात आले.हा समारंभ बिहारमधील भागलपूर येथे सोमवारी पार पडला, तसेच बिहारमधील विविध योजनांचे उद्घाटन, तसेच शिलान्यास मोदी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्याबाबत म्हणाले की, जे चारा चोरतात ते कधीही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करू शकत नाहीत. 

‘आधीच्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, पूर्वीच्या सरकारांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले होते. कृषी निर्यातीत अलीकडे झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी चांगला भाव मिळाला.आता बिहारच्या मखानाची बाजारपेठही आम्ही वाढविणार आहोत. बिहारमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री नितीशकुमार, केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान, गिरीराजसिंग आणि चिराग पासवान यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

काँग्रेसकडून लांगुलचालन मतांसाठी : नितीशकुमारमुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितले की, विशिष्ट धर्मीयांच्या मतांसाठी त्यांचे लांगुलचालन करणाऱ्या काँग्रेस व राजद आघाडीला जातीय दंगली कधीही रोखता आल्या नाहीत. २००५ मध्ये आम्ही सत्तासूत्रे स्वीकारली तेव्हा बिहारमध्ये कायदा-सुव्यवस्थेची अतिशय खराब स्थिती होती; पण आता परिस्थिती बदलली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवNitish Kumarनितीश कुमार