रायपूर - भारतात टॅलेंटची कमी नाही, पण ग्रामीण भागात लपलेलं, असलेलं हे टॅलेंट हव्या त्या जागी पोहोचत नाही. ग्रामीण भारतातील या टॅलेंटला योग्य व्यासपीठ मिळाल्यास ही तरुणाई नक्कीच देशाचं नाव लौकिक करू शकते. आमीर खानची प्रमुख भूमिका असलेल्या 3 इडियट चित्रपटात आपण पाहिलेल्या डीन (कॉलेज प्रमुखाला) कधीच विसरणार नाही. राजकुमार हिरानींच्या या चित्रपटातील विरु सहस्त्रबुद्धे या डीनने दोन हातांनी लिखाण करुन कमालचं केली आहे. बोमण इराणी यांनी साकारलेल्या भूमिकेचं कौतुकही झालं.
थ्री इडियट चित्रपटातील विरू सहस्त्रबुद्धे या कॅरेक्टरपासून प्रेरणा घेऊन एका मुलीने चक्क दोन्ही हातांनी धडे गिरवायला सुरूवात केली आहे. रायपूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन विद्यार्थीनीला एकाच वेळी दोन हातांनी लिखाण करण्याची कला अवगत झाली आहे. विशेष म्हणजे दोन्ही हातांनी तितक्याच गतीने ही मुलगी लिखाण करू शकते. काव्य चावडा असं या मुलीचं नाव असून यासाठी मी विशेष मेहनत घेतल्याचं तिन म्हटलं आहे. मी गेल्या 3 ते 4 वर्षांपासून यासाठीचा सराव करत असून बारकाईनं लक्ष दिलं आहे. मला थ्री इडियट चित्रपटातील व्हायरस (बोमण इराणी) या कॅरेक्टरपासून यासाठी प्रेरणा मिळाल्याचं तिनं म्हटलंय.