शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

प्रेरणादायी! ८५ हजाराची नोकरी सोडून इंजिनिअर करतोय शेती; हजारो रुपयांची भाजी पिकवतेय गावची माती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 12:45 IST

महेंद्र सिंह यांनी १७ वर्षांपूर्वीच आपले मॅकेनिकल इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले आहे

उत्तराखंड राज्यात डोंगराळ प्रदेशातील तरुण वर्ग गाव सोडून शहरात नोकरी-उद्योगधंद्यासाठी जात आहे. मात्र, चमोली जिल्ह्यातील सरतोली गावच्या महेंद्र सिंह बिष्टा हे तरुणांना भाजीपाला लागवड अन् फुलांच्या शेतीतून रोजगार निर्मित्तीसाठी प्रेरणा देत आहेत. महेंद्रचा हा प्रेरणादायी उपक्रम पाहून त्याला सरकार आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटनांकडून सन्मानित केलं जात आहे. तर, इतरही युवकांना महेंद्रपासून प्रेरणा मिळाली असून तेही आता भाजीपाला लागवड आणि फुलांच्या शेतीकडे आकर्षित होत आहेत. 

महेंद्र सिंह यांनी १७ वर्षांपूर्वीच आपले मॅकेनिकल इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर, ते राजधानी दिल्लीतील ओमॅक्स ऑटो लिमिटेड कंपनीमध्ये प्रोडक्शन मॅनेजरच्या पदावर कार्यरत होते. तेथे दरमहा ८५ हजार रुपये पगारही त्यांना मिळत होता. मात्र, सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांनी स्वयंरोजगाराची इच्छा व्यक्त करत गावाकडची वाट धरली. 

गावाकडे आल्यानंतर ग्रामीण भागातील पडीक जमीन २० वर्षांसाठी भाडेतत्त्वार घेत महेंद्रसिंह यांनी भाजीपाला लागवडीचा व्यवसाय सुरू केला. त्यासोबतच, दुग्धव्यवसायाचाही उद्योग सुरू केला आहे. सध्या महेंद्रला या उद्योगातून दरमहा ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. महेंद्र यांच्या उत्तम भाजीपाला लागवडीच्या कामांना पाहून आयएसएचआरडी (इंडियन सोसाइटी ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्च एण्ड डेव्हलपमेंट इंस्टिट्यूट) ने त्यांना २०१९-२० साठी पंतनगर कृषि विविमध्ये आयोजित कार्यक्रमात देवभूमि बागवानी पुरस्काराने सम्मानित केले. 

डोंगराळ प्रदेशात रोजगार म्हणजे केवळ नोकरीकडे पाहिले जाते. मात्र, डोंगराळ भागात नोकरीच्या संधीही कमी असतात. त्यामुळे, राज्यातून स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते. म्हणूनच, महेंद्रने गावाकडची वाट धरत भाजीपाला लागवडीकडे लक्ष केंद्रीत केले. त्याने सध्या, २०० निंबू आणि ५० किवीच्या झाडांची लागवड केली आहे. यांसह, मौसमी फळभाज्यांसह पॉलिहाऊसमध्ये बैमौसमी भाज्यांचीही लागवड महेंद्रद्वारे केली जात आहे.  

टॅग्स :jobनोकरीUttarakhandउत्तराखंडFarmerशेतकरी