शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

प्रेरणादायी! UPSC साठी नाकारल्या ISRO सह 6 सरकारी नोकरीच्या ऑफर; पहिल्याच प्रयत्नात IPS

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 10:29 IST

तृप्ती भट यांनी नोकरीच्या या सर्व मोठ्या ऑफर सोडून यूपीएससीची परीक्षा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. कारण त्यांनी आयपीएस ऑफिसर होण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं.

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अनेकांचा प्रवास हा इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो. अशीच एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीजण प्रचंड मेहनत घेतात. ध्येय गाठण्यासाठी खूप प्रयत्न करतात. आयपीएस तृप्ती भट यांची गोष्टही अशीच आहे. UPSC साठी त्यांनी 6 सरकारी नोकरीच्या ऑफर नाकारल्या. इतकच नाही तर ISRO मधली मोठी ऑफरही तृप्ती यांनी नाकारली. 

आयपीएस ऑफिसर तृप्ती भट या उत्तराखंडच्या अल्मोडाच्या रहिवासी आहेत. एका सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. तसेच चार भावंडामध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या. बारावीनंतर त्यांनी पंतनगर युनिव्हर्सिटीमधून मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक केलं. तृप्ती यांनी ISRO सह सहा नोकऱ्यांसाठीची परीक्षा पास केली होती. तसेच अनेक प्रसिद्ध खासगी संस्थांकडून त्यांना जॉबची ऑफर होती. 

तृप्ती भट यांनी नोकरीच्या या सर्व मोठ्या ऑफर सोडून यूपीएससीची परीक्षा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. कारण त्यांनी आयपीएस ऑफिसर होण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. पहिल्याच प्रयत्नात तृप्ती यांनी यूपीएससीची परीक्षा पास केली आणि 165 रँक मिळवत IPS ऑफिसर झाल्या. 

आयपीएस तृप्ती भट यांनी राष्ट्रीय स्तरावर 16 व 14 किमी मॅरेथॉन आणि राज्य स्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल जिंकलं आहे. यासोबतच त्या तायकांडो आणि कराटेमध्ये देखील पारंगत आहेत. तृप्ती यांच्या प्रवासातून अनेक तरुणांना प्रेरणा मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी