शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या जेवणात किडे, झुरळे! कॅटरिंग सेवेविरोधात प्रवाशांच्या ६,९४८ तक्रारी, ५०० टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 14:34 IST

माहिती अधिकाराच्या अर्जावर दिलेल्या उत्तरात ‘आयआरसीटीसी’ने विविध माहिती दिली

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या कॅटरिंग सेवेविरोधातील म्हणजेच रेल्वेत पुरविण्यात येणाऱ्या जेवणाच्या विरोधातील तक्रारींत मार्च २०२२ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ५०० टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती भारतीय रेल्वे कॅटरिंग व पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी) दिली आहे. रेल्वेतील जेवणात माश्या, किडे, धुळ, उंदीर आणि झुरळे आढळून असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे.

माहिती अधिकाराच्या अर्जावर दिलेल्या उत्तरात ‘आयआरसीटीसी’ने ही माहिती दिली आहे. या कालावधीत वंदे भारत, राजधानी, शताब्दी, दुरांतो आणि मेल एक्स्प्रेस यांसारख्या आलिशान गाड्यांतील जेवणाबाबतही लोकांच्या तक्रारीत वाढ झाली आहे.

  • वर्षभरात कमालीची वाढ

रेल्वेतील अन्नाबाबतच्या प्रवाशांकडून केल्या जाणाऱ्या तक्रारींची संख्या एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत वाढून ६,९४८ झाली. मार्च २०२२ च्या अखेरीस ती अवघी १,१९२ इतकी होती. एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२४ या काळात मिळालेल्या एकूण तक्रारींची संख्या ११,८५० इतकी होती. 

६८ आस्थापनांना कारणे दाखवा

  • आयआरसीटीसी’ने म्हटले की, ‘आलेल्या तक्रारींवर कारवाई करताना ६८ कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जानेवारी २०२१ ते मार्च २०२४ या कालावधीत ३ कॅटरिंग कंत्राटे रद्द करण्यात आली.’ 
  • वास्तविक एका वृत्तानुसार, ‘आयआरसीटीसी’कडे १,५१८ कॅटरिंग करार होते. त्यापैकी फक्त ३ करार रद्द झाले आहेत.  २०१७ मध्ये नियंत्रक व महालेखापाल (कॅग) यांच्या ऑडिट अहवालात धक्कादायक माहिती समोर आली. 
  • रेल्वेतील जेवणात माश्या, किडे, धूळ, उंदीर आणि झुरळे आढळून आली.
टॅग्स :railwayरेल्वे