शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या खुर्चीला धोका नसल्याची सुत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2017 17:26 IST

हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना भाजपा पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावलं होतं.

ठळक मुद्दे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना भाजपा पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावलं होतं.राज्यात उफाळून आलेल्या हिंसाचारामुळे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची खुर्ची जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

नवी दिल्ली, दि. 26- हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना भाजपा पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावलं होतं. गुरमीत राम रहीम यांच्या अटकेनंतर हरयाणामध्ये झालेल्या हिंसाचारामुळे त्यांना दिल्लीतून बोलावणं आलं होतं. राज्यात उफाळून आलेल्या हिंसाचारामुळे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची खुर्ची जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. याविषयी दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्त्वाखाली चर्चादेखील करण्यात आली. पण यामध्ये खट्टर यांच्या राजीनाम्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खट्टर यांच्या मुख्यमंत्रीपदाला कोणताही धोका नाही. यासोबतच पक्षाकडून त्यांच्याकडे स्पष्टीकरणही मागितलं जाणार नाही, अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे.

हरयाणातील स्थितीवर चर्चा करण्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहांनी दिल्लीत बैठक बोलावली होती. या बैठकीला हरयाणाचे प्रभारी अनिल जैन, कैलाश विजयवर्गीय उपस्थित होते. या बैठकीनंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा घेण्याचा विचार सध्या तरी पक्षाच्या नेतृत्त्वाकडून करण्यात आलेला नाही. याशिवाय खट्टर यांना दिल्लीत बोलावून त्यांना समज दिली जाणार असल्याचं वृत्त चुकीचं असल्याचंही भाजपाकडून सांगण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री खट्टर यांना पक्ष नेतृत्त्वाने दिल्लीत बोलावल्याची बातमी चुकीची आहे, असे प्रभारी अनिल जैन यांनी सांगितलं. याशिवाय विरोधकांनी या प्रकरणाचं राजकारण करु नये, असंही त्यांनी म्हटलं आहे. ‘डेरा आणि त्याचं महत्त्व नाकारता येणार नाही,’ असं अमित शहा यांनी बैठकीत बोलाताना म्हटलं. ‘डेराचं महत्त्व लक्षात घेता परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळण्यात आली,’ असं ते पुढे म्हणाले. प्रसारमाध्यमांनी हरयाणामधील या परिस्थितीसाठी मनोहर लाल खट्टर यांना जबाबदार धरलं आहे. राज्य सरकारच्या निष्क्रीयतेमुळे ही परिस्थिती उदभवल्याचा आरोप प्रसारमाध्यमांनी केला आहे. मनोहर लाल खट्टर यांनी 26 ऑक्टोंबर 2014 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तीनवर्षात तीनवेळा हरयाणात अशा प्रकारचा हिंसाचार झाला आहे.