शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेत पुढील आठवड्यात महागाईवर होणार चर्चा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 06:36 IST

माफी मागितल्यानंतरच खासदारांचे निलंबन घेणार मागे - नायडू

हरीश गुप्तानवी दिल्ली : सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये निर्माण झालेली कोंडी लवकरच राज्यसभेत संपुष्टात येण्याची शक्यता आहे. विविध वस्तूंच्या दरवाढीसंदर्भात राज्यसभेत पुढील आठवड्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. सभागृहात केलेल्या गैरवर्तनाचे गांभीर्य निलंबित सदस्यांना लक्षात आले आणि त्यांनी माफी मागितली तरच निलंबनाची कारवाई मागे घेण्याची तयारी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी दर्शविली आहे.

यासंदर्भात राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू, विरोधी पक्षांचे नेते तसेच संबंधित खात्यांचे मंत्री यांची बुधवारी महत्वाची बैठक झाली. राज्यसभेतील १९ खासदारांचे झालेले निलंबन ही मोठी संख्या आहे. हे निलंबन रद्द करावे अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेत्यांनी राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांच्याकडे केली. तसेच दरवाढीसंदर्भात राज्यसभेत चर्चा करण्यासाठी दिवस निश्चित केला जावा असेही विरोधी पक्षांतर्फे सांगण्यात आले. या बैठकीत केंद्रीय संसदीय कामकाज खात्याचे मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, वित्तमंत्री निर्मला सीतारामन या कोरोनातून पूर्णपणे बऱ्या झाल्यानंतर दरवाढीच्या मुद्द्यावरील चर्चेला नक्की उत्तर देतील. राज्यसभाखासदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर किंवा निलंबनाचा कालावधी या आठवड्याच्या अखेरीस संपल्यानंतर लवकरच दरवाढीच्या मुद्द्यावर राज्यसभेत चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांनी केली. 

त्यावेळी ६३ सदस्य झाले होते निलंबित१९८९ साली लोकसभेच्या ६३ सदस्यांना गैरवर्तनाबद्दल निलंबित करण्यात आले होते. २०१५ साली २५ खासदारांना गैरवर्तनाबद्दल निलंबित केले होते. त्याचे दाखले नायडू यांनी विरोधी पक्षनेत्यांना दिले. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या प्रकृतीबद्दल नायडू यांनी विचारपूस केली. दरवाढीच्या प्रश्नावर सभागृहात त्या कधी उत्तर देऊ शकतील याबद्दलही त्यांच्याशी नायडू यांनी चर्चा केली.

  ‘पुन्हा अशी चूक करू नका’राज्यसभेच्या कामकाजाचे व्हिडिओ चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर झळकविणाऱ्या एका खासदाराला सभापती व्यंकय्या नायडू यांनी बोलावून घेतले. त्या खासदाराच्या कृतीमुळे सभागृहाच्या नियमांचा भंग झाला आहे हे सभापतींनी त्यांना निदर्शनास आणून दिले. पुन्हा अशी चूक करू नका असा इशाराही या खासदाराला नायडू यांनी दिला. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाMember of parliamentखासदारInflationमहागाई