शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महागाईने सर्वांना त्रास; मात्र भारतात मंदी नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 12:35 IST

ब्लूमबर्गचा अहवाल; बड्या अर्थव्यवस्थांवर मंदीचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महागाईने नागरिक हैराण झालेले असतानाही भारतवगळता इतर आशियाई देशांमध्ये मंदीची शक्यता अधिक असल्याचे ब्लूमबर्गच्या अहवालात म्हटले आहे. चीन, जपान, अमेरिका, ब्रिटनसह इतर युरोपीय देशांना यापूर्वीच मोठ्या आर्थिक मंदीचा इशारा देण्यात आला आहे.तज्ज्ञानी दिलेल्या माहितीनुसार, सतत वाढत असलेल्या महागाईमुळे जगभरातील प्रमुख केंद्रीय बँका व्याजदरात मोठी वाढ करत आहेत. त्यामुळे महागाई आणखी वाढत आहे. यामुळे अनेक देश मंदीच्या छायेत आले आहेत.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या विकास दराच्या अंदाजात घट केली आहे. आयएमएफने म्हटले की, २०२२-२३ मध्ये देशाचा जीडीपी ७.४ टक्के दराने वाढेल, जो पूर्वी ८.२ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. यांच्यावर मंदीची छाया ४० टक्के अमेरिकेत मंदी येण्याची शक्यता असून, तसा इशारा जगभरातील अर्थतज्ज्ञांनी दिला आहे. ५० ते ५५ टक्क्यांपर्यंत युरोपमध्ये आर्थिक मंदी येण्याची शक्यता.

या देशांमध्ये अधिक महागाईव्हेनेझुएलामध्ये सध्या महागाई प्रचंड असून, ती तब्ब्ल १६७ टक्क्यांवर पोहोचली आहे, तर तुर्कीमध्ये ७८.६ टक्के, अर्जेंटिनामध्ये ६४ टक्के, रशियामध्ये १५.९ टक्के, पोलंडमध्ये १५.५ टक्के, ब्राझीलमध्ये ११.९ टक्के आणि स्पेनमध्ये १०.२ टक्के महागाईचा दर आहे.

सर्वांत आनंदी देशांनाही फटकासर्वात आनंदी देश म्हणून ओळख असलेल्या फिनलँडलाही सध्या महागाईचा फटका बसला आहे. फिनलँडमध्ये महागाई ७.८ टक्के आहे. थायलंडमध्ये ७.७ टक्के, जर्मनीमध्ये ७.७ टक्के, दक्षिण अफ्रिकामध्ये ७.४ टक्के महागाई आहे.

विकसितदेशांतील महागाईब्रिटन     ९.४% अमेरिका     ९.१% आयर्लंड     ९.१% पोर्तुगाल     ८.७% स्विडन     ८.७% नेदरलँड     ८.६% युरोपीय देश     ८.६% कॅनडा     ८.१% 

आशियाई देशांमधील महागाईजपान    २.२% तैवान     २.३% चीन     २.५% इंडोनेशिया ४.४% सिंगापूर ५.६% दक्षिण कोरिया ६.० फिलिपिन्स ६.१% भारत ७.०१% 

टॅग्स :Inflationमहागाईbusinessव्यवसाय