शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

सिंधू सुदर्शन युद्ध सरावात ‘हेलीबोर्न’ने घेतला अचूक वेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 02:47 IST

ताशी ६0 कि.मी. वेग : के ९ वज्र तोफेने वाढविली तोफखान्याची मारक क्षमता

- निनाद देशमुखपोखरण (राजस्थान) : भारतीय तोफखान्यात नव्याने दाखल झालेल्या कोरियन बनावटीच्या ‘के ९ वज्र’ तोफांनी सिंधू सुदर्शन युद्ध सरावात लक्ष्याचा अचूक वेध घेऊन मारक क्षमता सिद्ध केली. गेल्या वर्षी नाशिक येथे एका कार्यक्रमात या तोफा माजी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांच्या हस्ते लष्कराला सुपुर्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर प्रथमच या तोफा युद्ध सरावात वापरण्यात आल्या.सिंधू सुदर्शन युद्ध सरावात शनिवारी काल्पनिक युद्धात या तोफांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्यावर शत्रूकडून होणाऱ्या तोफांचा मारा चुकवत वेगाने हालचाली करून दुसºया सुरक्षित ठिकाणी जात शत्रूवर नेम धरत या तोफांनी त्याची ठिकाणे उद्ध्वस्त केली. यादरम्यान शत्रूला चकवण्यासाठी दुसºया ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे युद्धभूमीत सैनिकांना उतरविण्यात आले. तर दुसºया आघाडीवर रणगाडे, चिलखती वाहनातून जवानांना घेऊन शत्रूवर चाल करण्यात आली. घमासान युद्धात आधुनिक डॉपेचाद्वारे त्यांचा पराभव करत त्यांच्या भूमीवर भारतीय ध्वज फडकविण्यात आला. युद्ध सरावात शत्रू सीमेत गेल्यावर विविध बॅटल ग्रुपमध्ये योग्य ताळमेळ साधण्यासाठी नव्या तंत्राचा वापर करण्यात आला. शत्रूची चारही बाजूने कोंडी करत भारतीय सैनिकांनी आपल्या क्षमता या सरावात सिद्ध केल्या.जवान पुढे जात असताना शत्रूची जास्तीतजास्त हानी करण्यासाठी रॉकेट आणि मिसाईलनंतर तोफखान्याचा वापर होतो. यापूर्वी लष्कराच्या तोफखान्याकडे मोठ्या अंतरावर मारा करू शकणाºया बोफोर्स तोफा होत्या. मात्र, वेगाने हालचाली करण्यास मर्यादा होत्या. ही उणीव भरून काढण्यासाठी के ९ वज्र तोफा दक्षिण कोरियाकडून खरेदी केल्या आहेत. यातील १८ तोफा हस्तांतरित केल्या आहेत, तर उर्वरित तोफा भारतातच दोन्ही देशांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे बनविण्यात येत आहेत.‘के ९ वज्र’ची वैशिष्ट्येदक्षिण कोरियाकडून खरेदी केलेल्या के ९ वज्र तोफेने भारतीय तोफखान्याची मोठी उणीव भरून काढली आहे. वज्र तोफा या रणगाड्यासारख्या वाहनावर बसविण्यात आल्या आहेत. यामुळे वेगाने एका ठिकाणावरून दुसºया ठिकाणी हालचाली करता येतात. ताशी ६० किमी वेगाने युद्धभूमीत ही तोफ एका ठिकाणावरून दुसºया ठिकाणी नेली जाऊ शकते. तर १५५ एमएम बॅरल तोफेतून ३ मिनिटांत १५ गोळे डागण्याची आणि जवळपास ४० किमीपर्यंत लक्ष्य भेदण्याची या तोफेची क्षमता आहे.