शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

4000 रुपयांचा CNG ही कंपनी देतेय मोफत, असा मिळवा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 10:27 IST

सीएनजी आणि पीएनजी पुरवणारी कंपनी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड(IGL)नं एक भन्नाट ऑफर वाहन चालकांना उपलब्ध करून दिली आहे.

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून देशातील प्रदूषणाचा स्तर वाढतच चालला आहे. त्यात राजधानी दिल्लीत प्रदूषणानं उच्चांकी पातळी गाठली आहे. त्यामुळे या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारबरोबर सीएनजी आणि पीएनजी पुरवठादार कंपन्याही पुढे सरसावल्या आहेत.दिल्ली आणि एनसीआरमध्ये प्रदूषणाचा वाढता स्तर पाहता सीएनजी आणि पीएनजी पुरवणारी कंपनी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड(IGL)नं एक भन्नाट ऑफर वाहन चालकांना उपलब्ध करून दिली आहे. IGLनं गाड्यांमध्ये सीएनजी किट बसवणाऱ्या वाहन चालकाला 4 हजार रुपयांपर्यंत मोफत सीएनजी देण्याची घोषणा केली आहे. या योजनेचं नाव 'पहिल्यांदा या आणि पहिल्यांदा मिळवा' ठेवण्यात आलं आहे. ही योजना पहिल्यांदा सीएनजी किंवा पीएनजी किट लावणाऱ्या पहिल्या 2 हजार ग्राहकांसाठी वैध आहे. 

  • 4 हजार रुपयांचा मोफत सीएनजी- या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपल्याला पेट्रोल कारमध्ये सीएनजीचा किट बसवावा लागणार आहे. सीएनजी किट लावल्यानंतर गाडीचं आरसी बुक आणि एक टेस्टिंग सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे. हे सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर आयजीएल आपल्याला 2 हजार रुपयांचं प्री-लोड स्मार्ट कार्ड आणि 2 हजार रुपयांची वैध कंपनी कूपन देते. आरसीची कॉपी आणि वैध हायड्रो टेस्टिंग सर्टिफिकेट आपल्याला दिल्ली-एनसीआरच्या सीएनजी पंपांवर जमा करावं लागणार आहे. 2 हजार रुपयांच्या प्री-लोडेड स्मार्ट कार्डानं आपण गाडीमध्ये सीएनजी टाकू शकता. 
  • 5 फेब्रुवारी 2019पर्यंत ही योजना लागू- ही योजना 1 डिसेंबर 2018 ते 5 फेब्रुवारी 2019पर्यंत वैध आहे. सीएनजी फिटेड/कन्वर्टेड कारसाठी 1 डिसेंबर 2018 ते 31 जानेवारी 2019पर्यंत लागू असेल. ही सुविधा दिल्ली-एनसीआरच्या 11 सीएनजी पंपांवर सुरू करण्यात आली आहे.