शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

Indira Gandhi Birth Anniversary : पंतप्रधान मोदी, राहुल गांधी अन् सोनिया गांधींनी इंदिराजींना वाहिली आदरांजली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 09:23 IST

Indira Gandhi Birth Anniversary : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती आहे.

ठळक मुद्देभारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती आहे.पंतप्रधान मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अनेक मान्यवरांनी इंदिरा गांधींना श्रद्धांजली वाहिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर इंदिरा गांधींना श्रद्धांजली वाहिली आहे.

नवी दिल्ली - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती आहे. जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अनेक मान्यवरांनी इंदिरा गांधींना श्रद्धांजली वाहिली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर इंदिरा गांधींना श्रद्धांजली वाहिली आहे. इंदिरा गांधींच्या समाधीस्थळी जाऊन सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आदरांजली वाहिली आहे. इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्यावतीने देशभरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. 'आयर्न लेडी' म्हणून इंदिरा गांधींचा जगभरात लौकिक आहे. आणीबाणी, ऑपरेशन ब्लू स्टार यांसारखे धाडसी निर्णय इंदिरा गांधींच्याच काळात भारताने घेतले होते. त्यामुळे अनेक कठोर प्रसंगांना इंदिरा गांधींना सामोरे जावे लागले होते. मात्र, इंदिराजींच्या याच धाडसी बाण्याचे कौतुक अनेक वर्षं होत आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीटरवर इंदिरा गांधींच्या आठवणींना उजाळा दिला आहे. वडील जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून इंदिरा गांधी राजकारणात आल्या. त्यांनी पहिल्यांदा पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळात सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला. शास्त्री यांच्या निधनानंतर त्या देशाच्या तिसऱ्या पंतप्रधान झाल्या. इंदिरा गांधींना 1971मध्ये भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली होती.

इंदिरा गांधी या भारताच्या एक सशक्त महिला पंतप्रधान राहिल्या आहेत. ज्यांच्या अढळ निर्णयांनी जगाला भारतापुढे झुकायला भाग पाडलं होतं. त्यांच्या कणखर भूमिका अन् कठोर निर्णयक्षमतेमुळेच बांगलादेश हा स्वतंत्र देश अस्तित्वात आला. भारतानं त्यांच्या कार्यकाळात अवकाश क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. पंजाबमध्ये उफाळून आलेला हिंसाचार थोपवण्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तसेच त्यांच्या कार्यकाळात भारत आण्विक संपन्न देश झाला. त्यांच्या कठोर निर्णय घेण्याच्या भूमिकेला विरोधकांनी नेहमीच विरोध केला. परंतु त्या कोणालाही न जुमानता देशाहिताचे निर्णय घेत राहिल्या. त्यामुळेच त्यांना 'आयर्न लेडी' म्हटलं जातं.

 

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधीSonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस