शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

'इंदिरा'ऐवजी चुकून 'अम्मा' बोलून फसले राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 12:10 IST

तामिळनाडूतील 'अम्मा कॅन्टीन' योजनेच्या धर्तीवर आजपासून कर्नाटकमध्ये 'इंदिरा कॅन्टीन' योजना सुरु करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देराहुल गांधी यांनी बुधवारी बंगळुरुत इंदिरा कॅन्टीनचं उद्घाटन केलं इंदिरा कॅन्टीनमध्ये पाच रुपयांत नाश्ता आणि 10 रुपयांत जेवण दिलं जाणार आहेबोलताना राहुल गांधींनी इंदिरा कॅन्टीनचा अम्मा असा उल्लेख केला

बंगळुरु, दि. 16 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी बंगळुरुत इंदिरा कॅन्टीनचं उद्घाटन केलं आहे. इंदिरा कॅन्टीनमध्ये पाच रुपयांत नाश्ता आणि 10 रुपयांत जेवण दिलं जाणार आहे. उद्घाटन केल्यानंतर राहुल गांधी यांनी कॅन्टीनमध्ये जाऊन जेवणाचा आस्वाद घेतला. राहुल गांधी यांनी जयनगर वॉर्डमध्ये कॅन्टीनचं उद्दाटन करताना राज्यामधील काँग्रेस सरकारने अशा कॅन्टीनची कल्पना अंमलात आणली याचा गर्व असल्याचं सांगितलं. मात्र यावेळी बोलताना राहुल गांधींची चांगलीच पंचाईत झाली. कारण बोलताना राहुल गांधींनी इंदिरा कॅन्टीनचा 'अम्मा' असा उल्लेख केला. विशेष म्हणजे तामिळनाडूतील 'अम्मा कॅन्टीन' योजनेच्या धर्तीवर आजपासून कर्नाटकमध्ये 'इंदिरा कॅन्टीन' योजना सुरु करण्यात आली आहे. 

'सर्वांना अन्न' या काँग्रेसच्या संकल्पनेकडे काँग्रसने उचललेलं हे पाऊल असल्याचं राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना सांगितलं. ते बोलले की, 'शहरातील कोणत्याही गरिबाला भुकेल्या पोटी राहावं लागू नये. बंगळुरुतील अनेक लोक मोठ्या घरात राहतात, महागड्या गाड्यांमध्ये फिरतात, त्यांच्यासाठी अन्न ही काही मोठी गोष्ट नाहीय मात्र येथे अनेक गरिब लोकही राहतात, ज्यांच्याकडे जास्त पैसे नसतात. इंदिरा कॅन्टीन अशा लोकांची सेवा करेल'.  

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी बजेट सादर करताना अशा प्रकारची कॅन्टीन सुरु करण्याची घोषणा केली होती. कर्नाटकाचे वित्तखाते सिध्दरामय्या यांच्याकडेच असून, त्यांनी बजेट वाचनामध्ये नम्मा कॅन्टीन असा उल्लेख केला होता. पण काँग्रेसच्या आमदारांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नाव देण्याची मागणी केल्यानंतर 'इंदिरा कॅन्टीन' असे या योजनेचे नामकरण करण्यात आले. अम्मा कॅन्टीन योजना तामिळनाडूत प्रचंड लोकप्रिय ठरली. जयललिता यांच्या अण्णाद्रमुकला सलग दुस-यांदा सत्तेत पोहचवण्यात ही योजनी महत्वपूर्ण ठरली होती. 

उत्तरप्रदेशात योगींनी सुरु केली अन्नपूर्ण योजना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एप्रिलमध्ये अन्नपूर्णा योजनेची घोषणा केल्यानंतर राज्यातील जनतेने त्याचे स्वागत केले. पण फार कमी जणांना माहिती असेल कि, योगी 2008 पासून गोरखपूरमध्ये अशा प्रकारची योजना राबवत आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्रीपद स्विकारण्याआधीच गोरखपूरचे खासदार असतानाच योगींनी अन्नपूर्णा भोजना सेवा योजना सुरु केली होती. या योजनेत गरीबांना फक्त 10 रुपयात जेवणाची थाळी मिळते. यामध्ये दोन चपाती, डाळ, भात आणि दोन भाज्या मिळतात.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी