शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आजारी सुटी टाकून इंडिगोचे चालक एअर इंडियाच्या भरतीसाठी दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 09:30 IST

अनेक उड्डाणे खोळंबली : डीजीसीए करणार चौकशी, टाटा समूहाने यावर्षी २७ जानेवारी रोजी एअर इंडियाचे नियंत्रण आपल्या हातात घेतले. आता एअर इंडियाने चालक दलाच्या नव्या सदस्यांसाठी भरती मोहीम सुरू केली आहे.

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या भरतीसाठी इंडिगोचे चालक दलाचे सदस्य आजारपणाची सुटी टाकून गेल्याने इंडिगोच्या देशांतर्गत विमान उड्डाणावर त्याचा थेट परिणाम झाला. इंडिगोच्या ५५ टक्के उड्डाणांना शनिवारी उशीर झाला. या प्रकरणाची डीजीसीए चौकशी करणार आहे. 

याबाबत विचारणा केली असता नागरी विमान महासंचालनालयाचे (डीजीसीए) प्रमुख अरुण कुमार यांनी रविवारी सांगितले की, याबाबत माहिती आम्ही घेत आहोत. सूत्रांनी सांगितले की, एअर इंडियाच्या भरती अभियानाचा दुसरा टप्पा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. आजारी सुटी टाकून इंडिगोचे चालक दलाचे बहुतांश सदस्य एअर इंडियाच्या भरतीसाठी गेले होते. त्यामुळे अनेक उड्डाणांना सुमारे तासभर विलंब झाला. इंडिगो सध्या रोज जवळपास १,६०० देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे संचालन करते. इंडिगोला याबाबत विचारणा केली असता कंपनीकडून प्रतिक्रिया देण्यात आली नाही. 

टाटा समूहाने यावर्षी २७ जानेवारी रोजी एअर इंडियाचे नियंत्रण आपल्या हातात घेतले. आता एअर इंडियाने चालक दलाच्या नव्या सदस्यांसाठी भरती मोहीम सुरू केली आहे. नवीन विमान खरेदी करणे आणि आपल्या सेवेत सुधारणा करण्याची योजना एअर इंडियाकडून आखण्यात येत आहे.

४५ टक्के विमानांना विलंबनागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, इंडिगोच्या ४५.२ टक्के विमानांनी शनिवारी वेळेवर उड्डाण केले. त्या तुलनेत शनिवारी एअर इंडिया, स्पाइसजेट, विस्तारा, गो फर्स्ट आणि एअर एशिया इंडियाची क्रमश: ७७.१ टक्के, ८०.४ टक्के, ८६.३ टक्के, ८८ टक्के आणि ९२.३ टक्के उड्डाणे वेळेवर झाली.  

इंडिगोत काय सुरू आहेत घडामोडीइंडिगोचे सीईओ रॉनजॉय दत्ता यांनी ८ एप्रिल रोजी कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे सांगितले होते की, पगार वाढविणे ही एक कठीण समस्या आहे; पण एअरलाइन्स नफा आणि स्पर्धात्मक वातावरण या आधारे वेतनाचे सतत पुनरावलोकन करेल. इंडिगोने ४ एप्रिल रोजी काही वैमानिकांना निलंबित केले होते. कारण, कोरोना काळात लागू केलेल्या वेतन कपातीच्या निषेधार्थ ते मंगळवारी संप करण्याची योजना आखत होते. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया