शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
3
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
4
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
5
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
6
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
7
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
8
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
9
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
10
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
11
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
12
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
13
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
14
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
15
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
16
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
17
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
18
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
19
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
20
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा

डास असल्याची तक्रार केल्यानं इंडिगोनं प्रवाशाला उतरवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 11:52 AM

प्रवाशाने गैरवर्तन केल्याचे इंडिगोचे स्पष्टीकरण

विमानात डास असल्याची तक्रार केल्यामुळे प्रवाशाला उतरवण्यात आल्याचा प्रकार लखनऊ विमानतळावर घडला आहे. बंगळुरुचे डॉ. सौरभ राय सोमवारी सकाळी लखनऊतील विमानतळावरुन प्रवासासाठी निघाले होते. इंडिगोच्या विमानात पोहोचल्यानंतर राय यांनी मोठ्या प्रमाणात डास असल्याची तक्रार केली. या तक्रारीमुळे आपल्याला विमानातून उतरवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तर राय यांनी धमकी दिल्याने आणि हायजॅक हा शब्द वापरल्याने सुरक्षेच्या नियमांनुसार कारवाई केल्याचे स्पष्टीकरण इंडिगोने दिले. डॉ. राय सोमवारी सकाळी ६ वाजता इंडिगोच्या विमानात चढले. यानंतर काही वेळातच त्यांनी विमानात मोठ्या प्रमाणात डास असल्याची तक्रार केली. मात्र विमानातील कर्मचाऱ्यांनी त्यांना शांत बसण्यास सांगितले. यामुळे राय यांचा विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी वाद झाला. कर्मचाऱ्यांनी राय यांना विमानातून उतरण्यास सांगितले. एका महिन्याआधीही इंडिगोचे कर्मचारी वादात सापडले होते. नवी दिल्ली विमानतळावर कर्मचाऱ्याने प्रवाशाला धक्काबुक्की केल्याने इंडिगोवर टीका झाली होती. 

डॉ. सौरभ राय यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. 'त्यांनी (कर्मचाऱ्यांनी) मला दहशतवादी म्हटले. माझ्यामुळे इतर प्रवाशांना धोका असल्याचेही ते म्हणाले,' असे राय यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी इंडिगोने प्रसिद्धीपत्रक जारी करत स्पष्टीकरण दिले आहे. 'लखनऊहून बंगळुरुला जात असलेल्या सौरभ राय यांनी गैरवर्तन केले. राय यांनी विमानात डास असल्याची तक्रार केली होती. मात्र कर्मचाऱ्यांनी त्यांची समस्या सोडवण्याआधीच राय यांनी धमकी देण्यास सुरुवात केली,' असे इंडिगोने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 

टॅग्स :IndigoइंडिगोAirportविमानतळ