शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विमान कर्मचारी मालवाहू कप्प्यात झोपला आणि थेट दुबईत पोहोचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 12:40 IST

मुंबई विमानतळावरील प्रकार; टेक-ऑफ घेताच आली जाग.

मुंबई  : दुपारी जेवणाच्या सुटीनंतर वा काम करायचा कंटाळा आला की बसल्या जागी छोटीशी डुलकी काढायची भारतीयांची फार जुनी सवय. मुंबई विमानतळावर रात्रपाळीसाठी तैनात असलेला एक कर्मचारी अशीच डुलकी काढण्याच्या नादात गाढ झोपी गेला आणि थेट दुबईला पोहोचल्याची घटना उघडकीस आली आहे.

इंडिगो एअरलाइन्ससाठी लोडर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासोबत रविवारी हा प्रकार घडला. ६ई- १८३५ हे विमान मुंबई ते अबूधाबी मार्गावर नियोजित होते. प्रवाशांचे बॅगेज आणि अन्य साहित्य चढवून झाल्यानंतर या कर्मचाऱ्याला फारसे काम नव्हते. विमान उड्डाणास अवकाश असल्याने त्याने मालवाहू कप्प्यातच डुलकी काढायचे ठरवले. सामानाच्या मागच्या बाजूला त्याने पुठ्ठा अंथरला व ताणून दिली. विमानतळाच्या उघड्याशार पठारावर जाणवणारी कडाक्याची थंडी त्या कप्प्याने दूर सारली आणि उबदार वातावरण तयार झाल्याने हा गाढ झोपी गेला. 

पहाटे २.५९ वाजता विमानाने टेक-ऑफ घेताच कंपने जाणवल्याने पठ्ठ्याला जाग आली. तेव्हा मालवाहू कप्प्याचे दार बंद आणि आत हा एकटाच. शांत बसून राहण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. दोन तासांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर विमान अबूधाबी विमानतळावर उतरले आणि त्याच्या जीवात जीव आला. स्थानिक कर्मचाऱ्यांनी कार्गो होल्डचे दार उघडल्यानंतर तेही दचकले. त्यांनी तात्काळ सुरक्षा यंत्रणांना पाचारण केले. वैद्यकीय तपासणीअंती त्याला कोणतीही इजा झाली नसल्याचे समोर आले. त्यानंतर चौकशीला सुरुवात करण्यात आली.

असा झाला परतीचा प्रवासवैद्यकीय तपासणीनंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. सर्व बाबींची पुष्टी केल्यानंतर त्याच्या परतीचा मार्ग मोकळा झाला. ज्या विमानाने तो दुबईत पोहोचला होता, त्या विमानाच्या परतीच्या फेरीने त्याला मुंबईला पाठविण्यात आले. पण मालवाहू कप्प्यातून नव्हे, प्रवासी म्हणून. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू असून, हवाई वाहतूक महासंचालनालयाने या कर्मचाऱ्याला डी-रोस्टर केल्याची माहिती इंडिगोतर्फे देण्यात आली.

टॅग्स :IndigoइंडिगोIndiaभारत