शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Dibrugarh Delhi Indigo Flight Fire : विमानातील प्रवाशाच्या मोबाईलला लागली आग, उडाली एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 11:06 IST

Dibrugarh Delhi Indigo Flight Fire : डीजीसीएच्या (DGCA) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, इंडिगोचे A320 निओ विमान VT-IJV कीप फ्लाइट क्रमांक 6E-2037 आसाममधील दिब्रुगढहून दिल्लीला येत होते.

नवी दिल्ली : विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशाच्या मोबाईलला आग लागल्याची घटना घडली. इंडिगोच्या A320 विमानात ही घटना घडली. यावेळी विमानात एका प्रवाशाच्या मोबाईल फोनमधून अचानक स्पार्किंग आणि धूर निघू लागला. यामुळे एकच खळबळ उडाली. यानंतर केबिन क्रूला माहिती देण्यात आली. विमान कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवली.

डीजीसीएच्या (DGCA) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, इंडिगोचे A320 निओ विमान VT-IJV कीप फ्लाइट क्रमांक 6E-2037 आसाममधील दिब्रुगढहून दिल्लीला येत होते. यादरम्यान एका प्रवाशाच्या मोबाईलमध्ये स्पार्किंग होऊन धूर येऊ लागला. याची माहिती तातडीने केबिन क्रूला देण्यात आली. यानंतर केबिन क्रूच्या सदस्यांनी केबिन अग्निशमन यंत्राच्या मदतीने आग आटोक्यात आणली. या दरम्यान कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, विमान दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) सुरक्षितपणे उतरले. इंडिगोने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिब्रुगढ ते दिल्लीच्या फ्लाइटमध्ये मोबाईलमधून धूर निघत असल्याची घटना घडली आहे. क्रू मेंबर्सनी वेळ न घालवता त्वरीत परिस्थिती नियंत्रणात आणली. विमानातील कोणत्याही प्रवाशाचे किंवा मालमत्तेचे कोणतेही नुकसान झालेले नाही.

टॅग्स :Indigoइंडिगोfireआग