शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...
4
वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू
5
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
6
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
7
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
8
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
9
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
10
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
11
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
12
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
13
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
14
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
16
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
17
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
18
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
19
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
20
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास

'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 08:59 IST

Bangladesh Voter List: पश्चिम बंगालमधील एका डॉक्टर कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे भारतासह बांगलादेशच्या मतदार यादीत आढळल्याने खळबळ. पोलीस चौकशी करत आहेत; दुहेरी नोंदीवर प्रश्नचिन्ह.

कोलकाता : पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्याच्या गोबरडांगा परिसरातून एक धक्कादायक आणि गंभीर प्रकरण समोर आले आहे. येथील एका प्रतिष्ठित डॉक्टर कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे भारतासह शेजारील देश बांगलादेशच्या मतदार यादीतआढळल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार मतदार ओळखपत्रातील मोठ्या घोळाकडे लक्ष वेधणारा आहे.

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोबरडांगा येथे वास्तव्यास असलेल्या डॉ. गौतम ढाली यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे भारतीय मतदार यादीत तर आहेतच; पण त्याचसोबत बांगलादेशातील सातक्षीरा भागाच्या मतदार यादीतही त्यांची नोंद असल्याचे उघड झाले आहे. ढाली कुटुंबाकडे वैध आधार कार्ड आणि भारतीय मतदार ओळखपत्र (बेड़गूम-२ ग्रामपंचायतीचे १६४ नंबर बूथ) असताना, परदेशातील यादीत त्यांची नोंदणी कशी झाली, हा मोठा प्रश्न आहे.

पोलिसांकडून चौकशी सुरू

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांनी तातडीने डॉ. गौतम ढाली यांच्या घरी जाऊन कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली. चौकशीदरम्यान, डॉ. ढाली यांचे वडील तारकनाथ ढाली यांनी खुलासा केला की, त्यांचे कुटुंब सुमारे १० वर्षांपूर्वी बांगलादेशातून भारतात आले आणि तेव्हापासून ते गोबरडांगा येथे राहत आहेत. त्यांनी कायदेशीर मार्गाने भारतात प्रवेश केल्याचा दावा केला असून, पोलिसांनी त्यांच्याकडून वैध कागदपत्रे आणि दस्तऐवज सादर करण्याची मागणी केली आहे.

प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

जर या कुटुंबाची नावे बांगलादेशात मतदानासाठी नोंदवलेली होती, तर त्यांना भारतीय मतदार ओळखपत्र कसे मिळाले? या 'दुहेरी' नोंदीमागील यंत्रणात्मक त्रुटी काय आहे किंवा हे जाणीवपूर्वक केलेले कृत्य आहे, याबद्दल आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

स्थानिक बेड़गूम-२ ग्रामपंचायतीच्या प्रमुखांनी याबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले असून, राज्य प्रशासनाला या प्रकरणाची माहिती दिली आहे. सीमावर्ती भागातील मतदारांच्या याद्यांची फेरतपासणी आणि प्रशासकीय स्तरावर झालेल्या कथित भ्रष्टाचाराची शक्यता पडताळून पाहणे आवश्यक झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : West Bengal family's names shockingly appear in Bangladesh voter list!

Web Summary : A West Bengal doctor's family is listed in both Indian and Bangladeshi voter rolls. Authorities are investigating how this happened, as the family claims Indian citizenship. Questions arise regarding administrative oversight and potential voter list fraud.
टॅग्स :Bangladeshबांगलादेशwest bengalपश्चिम बंगालElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग