शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची मुंबईत भेट, ११४ राफेल-हॅमर क्षेपणास्त्रे खरेदी करण्यास मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 16:13 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची आज मुंबईतील 'लोकभवन' येथे महत्त्वाची भेट झाली.

भारताच्या संरक्षण सिद्धतेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची आज मुंबईतील 'लोकभवन' येथे महत्त्वाची भेट झाली. या भेटीत दोन्ही देशांच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले असून, तब्बल ११४ राफेल फायटर जेट्स आणि शक्तिशाली हॅमर मिसाईलच्या खरेदीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आता हे राफेल विमान भारतातच तयार होणार असून, हा प्रकल्प तब्बल ३.२५ लाख कोटी रुपयांचा आहे.

राफेल आता 'मेक इन इंडिया'

मॅक्रॉन यांच्या भारत दौऱ्याच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्रालयाने ११४ राफेल फायटर जेट्सच्या निर्मितीला मंजुरी दिली. फ्रान्सची प्रसिद्ध 'दसॉल्ट' कंपनी आता भारतातील एका स्वदेशी कंपनीसोबत मिळून राफेलचा प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पामुळे भारत केवळ राफेलची निर्मितीच करणार नाही, तर भविष्यात आशियाई देशांनाही येथून या विमानांची निर्यात केली जाणार आहे. तसेच भारतीय नौदलासाठी आवश्यक असलेल्या 'मरीन' राफेलची निर्मितीही याच प्रकल्पात होण्याची शक्यता आहे.

चीता आणि चेतक हेलिकॉप्टर्सना मिळणार सुटी

या ऐतिहासिक भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन बेंगळुरूनजीक असलेल्या एअरबस आणि टाटा कंपनीच्या संयुक्त हेलिकॉप्टर प्लांटचे व्हर्च्युअल उद्घाटन करणार आहेत. या कारखान्यात भारतीय लष्करासाठी 'H-125' लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर्स बनवली जातील. ही नवी हेलिकॉप्टर्स भारतीय हवाई दल आणि लष्करातील जुन्या पडलेल्या 'चीता' आणि 'चेतक' हेलिकॉप्टर्सची जागा घेतील. या सोहळ्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्री स्वतः प्लांटमध्ये उपस्थित राहणार आहेत.

या दौऱ्यात केवळ संरक्षण करारच नाहीत, तर आरोग्य, पुरवठा साखळी आणि कौशल्य विकासावरही डझनभर सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत. दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे वर्ष २०२६ हे 'भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष' म्हणून साजरे करण्याची घोषणा केली आहे. मॅक्रॉन यांची ही चौथी भारत भेट असली तरी मुंबईची ही पहिलीच भेट असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

जागतिक राजकारणावर प्रभाव

भारत आणि फ्रान्समधील ही धोरणात्मक भागीदारी आशिया-प्रशांत क्षेत्रातील सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मुंबईच्या लोकभवनमध्ये झालेल्या या द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही देशांचे संबंध एका नव्या उंचीवर पोहोचले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : India and France Strengthen Ties: Rafale Jets, 'Make in India'

Web Summary : India and France deepen defense cooperation. A deal for 114 Rafale fighter jets and HAMMER missiles was finalized, with production planned in India. The agreement also includes helicopter manufacturing, replacing older models and boosting regional security.
टॅग्स :Franceफ्रान्सNarendra Modiनरेंद्र मोदीRafale Dealराफेल डील