शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
2
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
3
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
4
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
5
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
6
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
7
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
8
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
9
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
10
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
11
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
12
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
13
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
14
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
15
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
16
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
17
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
18
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
19
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
20
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं

पाकिस्तानचा भारतावर क्षेपणास्त्र हल्ला, कॅप्टनसह चार जवान शहीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 07:06 IST

पाकिस्तानने रविवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील राजौरी व पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात अंदाधुंद गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केला.

जम्मू : पाकिस्तानने रविवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील राजौरी व पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात अंदाधुंद गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केला. त्यामध्ये भारतीय लष्कराचा एक कॅप्टन व तीन जवान शहीद झाले. हल्ल्यात बीएसएफचा एक जवान व दोन मुलांसह चार जण जखमी झाले आहेत. भारतीय जवानांकडून पाकच्या सैनिकांना चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.गेल्या काही दिवसांच्या शांततेनंतर पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची आगळीक केली. राजौरी जिल्ह्यातील तारकुंडी व सुंदरबनी भागामध्ये रविवारी संध्याकाळपासून अंदाधुंद गोळीबाराला सुरुवात केली. पाकिस्तानने क्षेपणास्त्राचा मारा करुन भारतीय लष्कराचे पूर्ण बंकर फोडले.पूंछ परिसरातील नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, अशी सूचना देण्यात आली आहे. जानेवारीत पाकिस्तानने केलेल्या तोफगोळ्यांचा मारा व गोळीबारामध्ये सात भारतीय जवान शहीद झाले होते व आठ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्याशिवाय ७० जण जखमी झाले होते. १८ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान पाकिस्तानी लष्कराने जम्मू, कठुआ, सांबा जिल्ह्यांतील सीमेवर तसेच पूंछ, राजौरी जिल्ह्यांतील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगतच्या भागात हल्ला केला होता. (वृत्तसंस्था)>कॅप्टन कपिल कुंडू यांना वीरमरणपाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये कॅप्टन कपिल कुंडू तसेच रामअवतार, सुभम सिंह, रोशनलाल हे तीन जवान शहीद झाले. या शहीद जवानांपैकी दोघे जम्मू-काश्मीर, एक मध्य प्रदेशचा होता. कॅप्टन कपिल कुंडू यांचा १० फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता. ते २३ व्या वर्षात पदार्पण करणार होते. वाढदिवसाच्या सहा दिवस आधीच कॅप्टन कुंडू यांना वीरमरण आले. हरियाणातील गुरगाव जिल्ह्यातील रणसिका गावचे ते मूळ रहिवासी होते.>मॉर्टेर्स बाँम्बचा मारापाकिस्तानने भारतीय लष्करावर अ‍ॅण्टी टँक गन मिसाइल, एलएमजी, मॉर्टेर्स बॉम्बचा मारा केला. पूंछ जिल्ह्यातील शाहपूर भागात पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये बीएसएफचा एक जवान व या भागातील इस्लामाबाद गावातील शाहनवाझ बानो व यासीन अरिफ ही दोन मुलेही जखमी झाली.>८४ शाळा३ दिवस बंदपाकिस्तानकडूनसुरु असलेल्या माºयामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून असलेल्या सुंदरबनी ते मांजाकोटे भागातील ८४ शाळा तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. पाकिस्तानला भारतीय लष्कराकडूनचोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. पाकिस्तानी हल्ल्यात भारतीय लष्कराचा कॅप्टन व तीन जवान शहीद झाल्याबद्दल जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबामुफ्ती यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत