शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

चीनच्या सीमेलगत बोगदे खोदण्याची भारताची तयारी, दळणवळण होणार सुलभ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 15:04 IST

चीनच्या सीमेलगत 73 रस्त्यांची बांधणी करण्याचे काम भारताने याआधीच सुरू आहे. आता मात्र प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अधिक चांगल्या दळणवळणासाठी भारताकडून अधिक उत्तम पर्याय शोधला जात आहे.

नवी दिल्ली -  चीनच्या सीमेलगत 73 रस्त्यांची बांधणी करण्याचे काम भारताने याआधीच सुरू आहे. आता मात्र प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अधिक चांगल्या दळणवळणासाठी भारताकडून अधिक उत्तम पर्याय शोधला जात आहे. त्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक बोगदे खोदण्याचा विचार भारताकडून करण्यात येत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील आपली क्षमता वाढवण्याबरोबरच भारत तेथे 17  बोगदे खोदण्याच्या योजनेवर काम करत आहे.  या मार्गावर बोगदे खोदल्याने रस्ते मार्गाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पोहोचण्याचे अंतर कमी होणार आहे. त्यामुळे भविष्यात डोकलामसारखी परिस्थिती उद्भवली तरी हिमवृष्टीमध्येही तेथे पोहोचणे लष्करासाठी सहजशक्य होणार आहे. सीमारेषेवर रस्ते बांधण्यासाठी जमिन अधिग्रहण करणे आणि फॉरेस्ट क्लिअरंस मिळण्यामध्ये खूप अडथळे येतात. मात्र बोगदे खोदण्यासाठी अशी अडचण येत नाही.  या क्षेत्रामधीली आपली क्षमता आणि तांत्रिक गजरा विचारात घेऊन सीमारेषेवर बांधकाम करणाऱी भारताची प्रमुख एजंसी बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (बीआरओ) ने या आठवड्यात दोन दिवसांच्या एका कार्यशाळेचे आयोजन केले होते.  त्यात डीएमआरसी, रस्ते वाहतूक आणि  महामार्ग मंत्रालय, रेल्वे, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, लष्कर आणि असे काम करणाऱ्या परदेशी कंपन्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेत बोगदे खोदण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करणे योग्य ठरेल याबाबत चर्चा झाली.  सीमारेषेवर रस्ते बांधण्यामधील आव्हाने -लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत संपूर्ण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लष्कराच्या चौक्या आणि सर्वसामान्य जनतेचा वर्षातून सुमारे 6 महिने पाऊस आणि हिमवृष्टीमुळे रस्ते मार्गाशी असलेला संपर्क तुटतो. - अशा परिस्थितीमध्ये केवळ हवाई मार्गाच्या मदतीवर लष्कर आणि नागरिकांना विसंबून राहावे लागते.  चीनने गेल्या महिन्यात डोकलाम भागात रस्ता बांधण्याची तयारी पुन्हा सुरू करताच, भारत- चीन सीमेवरील सर्व महत्त्वाच्या खिंडींजवळ जवळपास १00 नवे रस्ते बांधण्याची रणनीती भारत सरकारने तयार केली. सीमावर्ती भागात पहिल्या टप्प्यात महत्त्वाचे २५ रस्ते, तर दुसºया व तिसºया टप्यात प्रत्येकी ५0 नवे रस्ते तयार होणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांकडून देण्यात आली होती. भारत-चीन दरम्यानच्या सीमावर्ती भागात १00 पेक्षा अधिक खिंडी आहेत व त्यापैकी ९० टक्के खिंडी एवढ्या दुर्गम भागात आहेत की, तेथे जाण्यासाठी रस्तेच अस्तित्वात नाहीत. सिक्कीम जवळच्या नाथू-ला खिंडीप्रमाणे सीमावर्ती भागातील प्रत्येक खिंडीपाशी पायाभूत सुविधा तयार असाव्यात व त्यामुळे या क्षेत्रात भारतीय सैन्यदलांच्या हालचाली अधिक सुकर व्हाव्यात, अशी सरकारची रणनीती आहे. 

टॅग्स :IndiaभारतDoklamडोकलामchinaचीनBorderसीमारेषा