शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आता अरुणाचल प्रदेशमध्ये तणाव?; भारतीय लष्कराच्या पेट्रोलिंगला चीनचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 18:40 IST

भारतीय लष्कर अतिक्रमण करत असल्याचा चीनचा दावा

डोक्लामनंतर आता अरुणाचल प्रदेशमध्ये भारत आणि चीनमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते. लष्करीदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या अरुणाचल प्रदेशमधील आसफिला क्षेत्रात भारतीय सैन्य देत असलेल्या पहाऱ्याला चीनने आक्षेप घेतला आहे. भारतीय सैन्याकडून घातली जाणारी गस्त म्हणजे अतिक्रमण आहे, असे चीनने म्हटले आहे. मात्र भारताने चीनचा आक्षेप धुडकावून लावला आहे. 15 मार्चला भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत चीनने भारताकडून अरुणाचल प्रदेशातील आसफिला क्षेत्रात सुरु असलेल्या पेट्रोलिंगला आक्षेप घेतला. मात्र चीनचा हा आक्षेप भारताने खोडून काढला. आसफिला परिसर अरुणाचल प्रदेशच्या सुबानसिरी जिल्ह्यात येतो. भारतीय लष्कराकडून या भागात नियमित गस्त घातली जाते. या भागातील भारतीय सैन्याचा पहारा म्हणजे अतिक्रमण असल्याचे चिनी सैन्याने म्हटले होते. मात्र भारताने यावर आक्षेप घेतला, असे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. 'आफसिला परिसरात दिल्या जाणाऱ्या पहाऱ्याचा चीनकडून होणारा विरोध अतिशय आश्चर्यजनक आहे,' असे एका भारतीय अधिकाऱ्याने म्हटले. या भागात चीनकडून अनेकदा घुसखोरी केली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष सीमारेषेबद्दल भारत आणि चीनमध्ये वाद आहेत. अरुणाचल प्रदेशातील तवांग प्रदेशाच्या मोठ्या भूभागावर चीनने अनेकदा दावा सांगितला आहे. भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत चीनने अतिशय आक्रमकपणे आसफिला क्षेत्रातील भारतीय लष्कराच्या गस्तीचा मुद्दा उपस्थित केला. भारतीय लष्कराच्या अशा कृतीमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढेल, असा सूचक इशाराही चीनकडून देण्यात आला. मात्र चीनचा हा आक्षेप भारतानेही आक्रमकपणे खोडून काढला. भारतीय लष्कर या भागातील गस्त कायम ठेवेल, अशा स्पष्ट शब्दांमध्ये चीनला भारतीय अधिकाऱ्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.  

टॅग्स :chinaचीनArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशDoklamडोकलाम