चीन, पाकिस्तान सावधान, भारताकडे आहे विक्रांत! सागरी सीमांची अभेद्य तटबंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 08:41 AM2021-08-11T08:41:07+5:302021-08-11T08:43:19+5:30

स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका बनविण्याची क्षमता भारताने प्राप्त केली असल्याचे यातून सिद्ध होणार आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानी नौदलाला भारतापासून अधिक सावध रहावे लागणार आहे.

Indias first indigenous aircraft carrier Vikrant successfully completes five day maiden sea voyage | चीन, पाकिस्तान सावधान, भारताकडे आहे विक्रांत! सागरी सीमांची अभेद्य तटबंदी

चीन, पाकिस्तान सावधान, भारताकडे आहे विक्रांत! सागरी सीमांची अभेद्य तटबंदी

Next

‘आयएनएस विक्रांत’ या स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका सरावाच्या अंतिम टप्प्यात आहे. आपल्या सागरी सीमांची तटबंदी अभेद्य करण्यात ‘आयएनएस विक्रांत’ महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका बनविण्याची क्षमता भारताने प्राप्त केली असल्याचे यातून सिद्ध होणार आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानी नौदलाला भारतापासून अधिक सावध रहावे लागणार आहे. भारताची सागरी प्रहारक्षमता वाढणार असल्याने दोन्ही शत्रूदेशांना धडकी भरली आहे. काय आहे ही युद्धनौका आणि हा प्रकल्प भारतासाठी का महत्त्वाचा आहे, जाणून घेऊ या.

आयएनएस विक्रांत असे नाव का देण्यात आले आहे?
भारताच्या पहिल्यावहिल्या युद्धनौकेचे नाव ‘आयएनएस विक्रांत’ हेच होते.
१९,५०० टन वजनाची ही युद्धनौका १९६१ मध्ये इंग्लंडकडून विकत घेण्यात आली होती. 
१९७१च्या पाकविरुद्धच्या युद्धात या युद्धनौकेने मोलाची कामगिरी बजावली होती. 
१९९७ मध्ये ‘आयएनएस विक्रांत’ नौदलातून निवृत्त झाली. तिच्या स्मरणार्थ नव्या नौकेला तिचे नाव देण्यात येणार आहे. 

‘आयएसी-१’ असे नाव का देण्यात आले आहे?
‘आयएनएस विक्रांत’ या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेची 
रचना आणि बांधणी देशातच करण्यात आली आहे. म्हणून या प्रकल्पाला स्वदेशनिर्मित विमानवाहू नौका (आयएसी असे संबोधले जाते. 
विमानवाहू युद्धनौकेची उभारणी ही भारतीय नौदलासाठी अभिमानास्पद कामगिरी आहे. यातून भारतीय नौदलाची ताकद सुस्पष्ट होते. 

१४ डेक्स नौकेवर असतील
१७०० नौसैनिकांना राहता येईल
२३०० नौकेवरील दालनांची संख्या
सर्व प्रकारची लढाऊ विमाने यावरून वाहून नेता येतील.

नव्या ‘विक्रांत’ची वैशिष्ट्ये काय आहेत?
५९ मीटर उंची
२६२ मीटर लांबी
६२ मी़टर रुंदी
४०,००० टन वजन
कमाल वेग : २८ सागरी मैल प्रतितास
किमान वेग : १८ सागरी मैल प्रतितास
 

 

Web Title: Indias first indigenous aircraft carrier Vikrant successfully completes five day maiden sea voyage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.