शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 20:58 IST

Air Train : जगभरातील कोण-कोणत्या देशांमध्ये एअर ट्रेनची सुविधा आहे? याबद्दल जाणून घ्या....

नवी दिल्ली : विकसित भारताचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने भारताने एक पाऊल पुढे टाकले आहे. भारतातील पहिली एअर ट्रेन येत्या काळात दिल्लीविमानतळावर सुरू होणार आहे. मात्र, तुम्हाला माहित आहे का? जगभरातील कोण-कोणत्या देशांमध्ये एअर ट्रेनची सुविधा आहे? याबद्दल जाणून घ्या....

दिल्ली विमानतळावर सुरू होणार एअर ट्रेन...राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या विमानतळांपैकी एक आहे. दिल्ली विमानतळावरून दररोज हजारो प्रवासी विमानातून प्रवास करतात. यामध्ये मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा समावेश आहे, ज्यांच्याकडे कनेक्टिंग फ्लाइट असते किंवा जे विमानतळाच्या टर्मिनल १ वर पोहोचतात आणि नंतर टर्मिनल २ किंवा ३ वर जाण्यासाठी रस्तेमार्गाचा वापर करतात. मात्र आगामी काळात अशा प्रवाशांना एअर ट्रेनमधून एका टर्मिनलवरून दुसऱ्या टर्मिनलवर सहज जाता येणार आहे.

दिल्लीतील एअर ट्रेनचा रुट कसा असेल?एअर ट्रेन सुरू झाल्यास विमान प्रवासी ट्रॅफिकमध्ये न अडकता काही मिनिटांत टर्मिनल ३ आणि टर्मिनल २ पर्यंत पोहोचू शकतात. या एअर ट्रेनच्या मार्गाची एकूण लांबी ७.७ किलोमीटर असणार आहे. योजनेनुसार, या एअर ट्रेनचे टर्मिनल १, टर्मिनल २ आणि टर्मिनल ३ तसेच एरोसिटी आणि कार्गो सिटी असे थांबे असतील. मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकल्प २०२७ च्या अखेरीस पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी डायलने निविदाही काढली असून या निविदेची निविदा प्रक्रियाही ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकल्पाची एकूण किंमत जवळपास दोन हजार कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

'या' देशांमध्ये सुरू आहे एअर ट्रेनयेत्या काही वर्षांत भारतातील पहिली एअर ट्रेन दिल्ली विमानतळावर धावणार आहे. दरम्यान, जगातील अनेक देशांमध्ये अजूनही एअर ट्रेन धावतात. ज्यामध्ये चीन, न्यूयॉर्क, जपानसह अनेक देशांची नावे आहेत.

कशी धावते एअर ट्रेन?एअर ट्रेनला ऑटोमेटेड पीपल मूव्हर असेही म्हणतात. एक स्वयंचलित ट्रेन प्रणाली, ज्याचा उपयोग विविध टर्मिनल्स आणि विमानतळावरील इतर महत्त्वाच्या ठिकाणांना जोडण्यासाठी केला जातो. माहितीनुसार, भारतात सुरू होणारी एअर ट्रेन एकतर पीलर आणि स्लॅबच्या आधारे हवेत धावणारी मोनोरेल असेल किंवा ती जमिनीवर धावणारी 'ऑटोमॅटिक पीपल मूव्हर एअर ट्रेन' असू शकते.

टॅग्स :delhiदिल्लीAirportविमानतळ