शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

भारताने पाडले टेहळणी करणारे पाकिस्तानचे ड्रोन, दुसऱ्यांदा प्रयत्न फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 06:33 IST

राजस्थानमधील बिकानेर क्षेत्रात सीमेलगत भारतीय हवाई दलाच्या सुखोई-३० या विमानाने पाकिस्तानचे टेहळणी करणारे एक लष्करी ड्रोन पाडले.

नवी दिल्ली : राजस्थानमधील बिकानेर क्षेत्रात सीमेलगत भारतीय हवाई दलाच्या सुखोई-३० या विमानाने पाकिस्तानचे टेहळणी करणारे एक लष्करी ड्रोन पाडले. यासाठी हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र डागण्यात आले. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता हे ड्रोन विमान भारतीय हद्दीत आल्याचा सुगावा रडार यंत्रणेमुळे सैन्यदलाला लागला होता. गेल्या सहा दिवसांत पाकिस्तानने भारतीय हद्दीत दुसऱ्यांदा ड्रोन पाठवून टेहळणी करण्याचा अयशस्वीप्रयत्न केला. या आधी भारतीय हद्दीत कच्छ परिसरात २७ फेब्रुवारी रोजी शिरलेले पाकिस्तानी ड्रोनही हवाई दलाने पाडले होते. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तानमध्ये विलक्षण तणाव निर्माण झाला आहे. भारतीय हवाई दलाच्या विमानांनी हल्ला चढवून पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी तळ उद््ध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्ताननेही भारतावर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. काश्मीरमधील कारवायांबरोबरच पाकिस्तानने राजस्थान, गुजरातच्या सीमाभागातही भारताविरोधात हालचाली सुरू ठेवल्या आहेत. त्यावर हवाई दलाने करडी नजर ठेवलेली आहे.