शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या चंद्र मोहिमेला ग्रहण, चंद्रयान-2 मिशन लांबणीवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 09:13 IST

भारताच्या अंतराळ संशोधनातील सर्वात महत्त्वाकांक्षी अशा चंद्रयान-2 मोहिमेला ग्रहण लागले आहे.

नवी दिल्ली - भारताच्या अंतराळ संशोधनातील सर्वात महत्त्वाकांक्षी अशा चंद्रयान-2 मोहिमेला ग्रहण लागले आहे. चंद्रयान-2 चे प्रक्षेपण पुन्हा एकदा काही काळ लांबणीवर टाकण्याचा निर्णय इस्रोने घेतला आहे. इस्रोमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्राचा अभ्यास करण्यासाठी इस्रोकडून चंद्रयान-2 चे प्रक्षेपण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार होते. मात्र आता ही मोहीम डिसेंबर 2018 पर्यंत टाळण्यात आली आहे. याआधी चंद्रयान-2चे प्रक्षेपण गतवर्षी एप्रिल महिन्यात करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र विविध कारणांमुळे भारताची ही मोहीम लांबणीवर पडत आहे. दरम्यान, चंद्रयान मोहीम लांबणीवर पडल्याने चंद्रावर पोहोचणारा चौथा देश बनण्याच्या भारताच्या प्रयत्नांनाही धक्का बसला आहे. चंद्रयान-2 मोहिमेला होत असलेल्या उशिरासाठी काही तांत्रिक अडचणी असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनी याआधीच चंद्रावर आपले उपस्थिती निर्माण केली आहे. दरम्यान, चंद्गावर पोहोचणारा चौथा देश बनण्यासाठी भारत आणि इस्राइल या देशांमध्ये स्पर्धा सुरू आहे. दरम्यान, भारताची चंद्रयान मोहीन लांबणीवर पडल्यामुळे इस्राइलकडे चंद्रावर पोहोचणारा चौथा देश बनण्याची चालून आली आहे.  भारताची ही दुसरी चंद्र मोहीम आहे. दरम्यान, चंद्रयान-2 हे पूर्णपणे स्वदेशी विकसित आहे. चंद्रयान-2 या अंतराळ यानाचे वजन 3 हजार 290 किलोग्रॅम आहे. तसेच हे यान चंद्राच्या चारी बाजूनी भ्रमण करून त्याची आकडेवारी एकत्र करेल.   

टॅग्स :Indiaभारतisroइस्रोnewsबातम्या