शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशातील हिंदूंच्या सुरेक्षेसाठी भारताचं मोठं पाऊल; अमित शाह यांनी समिती स्थापन केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 16:24 IST

गेल्या काही दिवसापासून बांगलादेशात गोंधळ सुरू आहे. नोकरीतील आरक्षणावरुन जोरदार निदर्शने सुरू आहेत.

बांगलादेशात गेल्या काही दिवसापासून नोकरीतील आरक्षणावरुन विद्यार्थ्यांनी निदर्शने सुरू केली आहेत. दरम्यान, पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. पण, तरीही बांगलादेशातील गोंधळ थांबलेला नाही. आता बांगलादेशातील हिंदूंना लक्ष केले जात असल्याची माहिती समोर आली.  यावर आता केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मोठं पाऊल उचलले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी घोषणा केली की, बांगलादेशातील सध्याची परिस्थिती पाहता, भारत-बांगलादेश सीमेवरील सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मोदी सरकारने एक समिती स्थापन केली आहे. भारतीय नागरिक, हिंदू आणि तेथे राहणाऱ्या इतर अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी समिती बांगलादेशातील आपल्या समकक्ष अधिकाऱ्यांशी संवाद साधेल.

कामाची बातमी! 'या' योजनेत गुंतवणूक करुन मालामाल होऊ शकतात; योजनेबद्दल जाणून घ्या

याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करुन माहिती दिली.  “बांगलादेशातील सध्याची परिस्थिती पाहता, भारत-बांगलादेश सीमेवरील (IBB) सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मोदी सरकारने एक समिती स्थापन केली आहे. भारतीय नागरिक, हिंदू आणि तेथे राहणाऱ्या इतर अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी समिती बांगलादेशातील आपल्या समकक्ष अधिकाऱ्यांशी संवाद साधेल. ही समिती एडीजी, सीमा सुरक्षा दल, पूर्व कमांड यांच्या नेतृत्वाखाली असेल, असं ट्विटमध्ये म्हटले आहे. 

बांगलादेशातील भारतीय आणि हिंदू समुदायाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. ही समिती  भारत-बांगलादेश सीमेवरील सुरक्षा आणि परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे काम करते. बांगलादेशात नुकत्याच झालेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक आणि अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षेच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

अनेक हिंदू मंदिरे, घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांची तोडफोड करण्यात आली आहे, आणि अवामी लीगशी संबंधित किमान दोन हिंदू नेते पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि देश सोडून भारतात गेले. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायावरील हल्ल्यांच्या घटनांदरम्यान, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते म्हणाले की, ते वांशिक कारणास्तव कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यांना किंवा हिंसाचाराला उत्तेजन देण्याच्या विरोधात आहेत. बांगलादेशातील हिंदू आणि अन्य अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ल्यांबाबत महासचिवांच्या प्रतिक्रियेशी संबंधित प्रश्नांना ते उत्तर देत होते.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBSFसीमा सुरक्षा दल