शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

उत्सुकता! भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान -३ मोहीम चंद्राकडे झेपायला सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 06:34 IST

चांद्रयान -३ च्या उड्डाणासाठी इस्रोने एलव्हीएम ३ प्रक्षेपक विकसित केले आहे.

भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान -३ मोहीम चंद्राकडे झेपायला सज्ज झाली आहे. १४ जुलैला दुपारी २.३५ वाजता होणाऱ्या उड्डाणाकडे अवघ्या देशवासीयांचे लक्ष लागले आहे. परंतु या मोहिमेसाठी इस्रोने चांद्रयान-२ च्या यशस्वी डिझाईनऐवजी फेल्युअर बेस्ड डिझाईनचा पर्याय निवडला आहे. परंतु मोहिमेदरम्यान कोणत्या गोष्टी अपयशी ठरू शकतात,  त्यासंदर्भात कोणत्या उपाययोजना कराव्यात, यावर भर दिला असल्याचे इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितले.

चौथा देश ठरणारचंद्रावर यशस्वी लॅण्डिंग झाल्यास भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर अशी कामगिरी करणारा जगातील चौथा देश ठरेल.

एलव्हीएम ३ द्वारे उड्डाणचांद्रयान -३ च्या उड्डाणासाठी इस्रोने एलव्हीएम ३ प्रक्षेपक विकसित केले आहे. देशातील आतापर्यंतचे हे सर्वात अवजड आणि अद्ययावत प्रक्षेपक आहे. त्याचे वजन ६४० टन इतके आहे.

चांद्रयान १ आणि २ अपयशी ठरल्यानंतर इस्रोने चांद्रयान-३ चे चंद्रावर यशस्वी लॅण्डिंग करण्यावर भर दिला आहे. सुरक्षित लॅण्डिंगसाठी इस्रोने ४ किमी x २.५ किमी इतके क्षेत्र वाढविले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवानजीक लॅण्डिंग ठिकाण निश्चित केले आहे, परंतु काही कारणास्तव ते शक्य न झाल्यास नजीकच्या योग्य ठिकाणी ते उतरवण्यात येईल. अतिरिक्त इंधनही उपलब्ध केल्याने यशस्वी लॅण्डिंग होईल, असा विश्वास सोमनाथ यांनी व्यक्त केला.

वेळ हुकल्यास नव्याने मोहीम१४ जुलैला दुपारी २.३५ चांद्रयान -३ चे उड्डाण निश्चित केले आहे. काही कारणास्तव ही वेळ हुकल्यास नवी तारीख आणि वेळ निश्चित केली जाईल. परंतु ती मोहीम पूर्णपणे नव्याने आखण्यात येईल, असेही सोमनाथ यांनी सांगितले.

आगामी मोहीम जपानसोबत चांद्रयान-३ नंतर इस्रो पुढील चांद्रमोहीम जपानच्या सहकार्याने राबविणार आहे. त्यासाठी जपानने लॅण्डरची निर्मिती करण्याची तयारी दर्शवली आहे. सध्या तांत्रिक पातळीवर चर्चा सुरू आहे. - एस. सोमनाथ, इस्रो प्रमुख  

टॅग्स :Chandrayaan-3चांद्रयान-3isroइस्रो