शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 13:34 IST

Coronavirus In India: देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ५ हजारांचा टप्पा ओलांडला असून गेल्या २४ तासांत ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि कोरोना मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.  पश्चिम बंगाल आणि केरळसह इतर काही राज्यांमध्ये मास्क घालण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यांसाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी करण्यात आली. कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये २० खाटांचा वॉर्ड राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. आरोग्य विभागाने म्हटले आहे की, "लोकांना घाबरण्याची गरज नाही. परंतु या धोकादायक आजाराबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे."

देशात सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये देशात सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आढळली आहेत. राज्यातील रुग्णांची संख्या १ हजार ८०६ वर पोहोचली आहे. बकरी ईदच्या दिवशी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयाने सामाजिक अंतर पाळण्याचे निर्देशही दिले. शिवाय, मास्क घालण्यावरही भर देण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. 

महाराष्ट्रात आतापर्यंत १८ जणांचा मृत्यूमहाराष्ट्रात आतापर्यंत १ हजार २७६ रुग्णांची नोंद झाली. राज्यात गेल्या २४ तासांत ११४ नवीन रुग्ण आढळले आहेत. चिंतेची बाब म्हणजे, राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत एकूण ५९२ सक्रीय रुग्ण आहेत. हरियाणा आणि तामिळनाडूमध्येही रुग्णांची संख्या वाढत आहे. हरियाणामध्ये कोरोनाचे ३१ नवीन रुग्ण आढळले आहेत.  तामिळनाडूतील रुग्णांची संख्या १९४ वर पोहोचली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस