शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: भारतीय जवानांकडे शस्त्रं होती, पण...; परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितली 'फॅक्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 17:53 IST

गलवान खोऱ्यातील भारताचा एकही जवान निशस्र नव्हता, मात्र करारानुसार तिथे हत्यारांचा वापर करता येणार नव्हता आणि त्यानुसार तो केला गेला नाही

ठळक मुद्देसीमेवर कर्तव्य बजावत असलेला प्रत्येक जवान शस्त्रसज्ज असतोआपली चौकी सोडत असताना सर्व जवान आपली शस्त्रे सोबत घेतात१५ जून रोजी गलवान खोऱ्यात तैनात असलेल्या सैनिकांजवळसुद्धा शस्त्रे होती

नवी दिल्ली - लडाख येथील गलवान खोऱ्यात चीनच्या सैनिकांसमोर भारताच्या जवानांना निशस्त्र का पाठवण्यात आले होते, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. त्यावरून निर्माण झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राहुल गांधींनी केलेला आरोप स्पष्ट शब्दात फेटाळून लावले आहेत. गलवान खोऱ्यातील भारताचा एकही जवान निशस्र नव्हता, मात्र करारानुसार तिथे हत्यारांचा वापर करता येणार नव्हता आणि त्यानुसार तो केला गेला नाही. असे जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे.

राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना एस. जयशंकर म्हणाले की, आपल्याला वास्तव समजून घेतले पाहिजे. सीमेवर कर्तव्य बजावत असलेला प्रत्येक जवान शस्त्रसज्ज असतो. आपली चौकी सोडत असताना सर्व जवान आपली शस्त्रे सोबत घेतात. १५ जून रोजी गलवान खोऱ्यात तैनात असलेल्या सैनिकांजवळसुद्धा शस्त्रे होती. चिनी सैनिकांशी हिंसक झटापट झाली, तेव्हा हत्यारांचा वापर न करण्याबाबतचा आदेश स्पष्ट होता. सीमेवर झालेल्या तणावावेळी हत्यारांचा वापर करायचा नाही हा नियम भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये दीर्घकाळापासून चालत आला आहे. १९९६ आणि २००५ मधील करारांनुसार ही परंपरा पाळली जात आहे, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबतच्या झटापटीत झालेल्या जवानांच्या मृत्यूवरून केंद्र सरकारला खरमरीत शब्दात जाब विचारला होता. देशाच्या वीर जवानांना जवानांना धोक्याच्या दिशेने निशस्त्र कुणी आणि का पाठवले, अशी विचारणा त्यांनी केली होती.

ट्विटरवर व्हिडीओ शेअर करून राहुल गांधी यांनी या घटनेवरून जाब विचारला होता, ‘’बंधु भगिनींनो चीनने भारताच्या निशस्र सैनिकांची हत्या करून एक मोठा अपराध केला आहे. माझा प्रश्न आहे की, या वीरांना निशस्त्र धोक्याच्या दिशेने कुणी आणि का पाठवले, याला कोण जबाबदार आहे? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला होता.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन