शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ड्रॅगनच्या ताब्यातील तिबेटवरून भारताचा उपग्रह गेला; चिनी सैन्यात एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 20:17 IST

भारतीय उपग्रहानं मोलाची माहिती मिळवली; चीनकडून सैन्याची जमवाजमव सुरू

नवी दिल्ली: गेल्या तीन महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये चीनच्या कुरापती सुरू आहेत. एका बाजूला शांतता प्रस्थापित करण्यासाठी संवाद सुरू असताना दुसऱ्या बाजूला सीमावर्ती भागात चीनची आगळीक सुरू आहे. त्यामुळे भारतीय सैन्य पूर्णपणे सतर्क आहे. चीनला जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी सीमेवरील फौजफाटा वाढवला आहे. विशेष म्हणजे भारतानं केवळ जमिनीवरूनच नव्हे, तर अवकाशातूनही चीनला तोडीस तोड उत्तर देण्याची तयारी ठेवली आहे. त्याचाच भाग म्हणून आता अवकाशातून चिनी सैन्यावर नजर ठेवली जात आहे.चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटवरून भारताना उपग्रह गेला. या उपग्रहानं चिनी सैन्याची बरीच माहिती गोळा केली. त्यानंतर चीनमध्ये एकच खळबळ उडाली. भारताच्या सुरक्षा संशोधन आणि विकास संस्थेनं (डीआरडीओ) तयार केलेला उपग्रह इमिसॅट इंटेलिजन्स इनपुट गोळा करण्याचं काम करतो. यामध्ये एक इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स सिस्टम 'कौटिल्य' लावण्यात आली आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाची माहिती गोळा करता येते.अरुणाचल प्रदेशजवळ असलेल्या तिबेटच्या वरून भारताचा उपग्रह गेल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली. हा भाग पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ताब्यात आहे. इस्रोनं तयार केलेल्या इमिसॅटमधील इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स सिस्टम शत्रूच्या जमिनीवरील ट्रान्समिशनचा वापर करून रेडिओ सिग्नलची माहिती मिळवतो. लडाखमधल्या पँगाँग त्सो येथील फिंगर ४ बद्दल भारत आणि चीनमध्ये झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारताचा उपग्रह तिबेटवरून गेला. त्यामुळे या भागात एकच खळबळ माजली.  

टॅग्स :chinaचीन