शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

38 वर्षानंतर सापडला जवानाचा मृतदेह; सियाचीनमध्ये ऑपरेशन 'मेघदूत'दरम्यान झाले होते शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 21:15 IST

1984 मध्ये सियाचिन ग्लेशियरमध्ये पेट्रोलिंग करण्यासाठी गेलेली एक टीम हिमस्खलनानत बेपत्ता झाली होती. त्यातील एका जवानाचा मृतदेह तब्बल 38 वर्षानंतर सापडला आहे.

नवी दिल्ली: सध्या देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र स्वातंत्रदिनाची धामधुम आहे. पण, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सियाचीनमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑपरेशन मेघदूतमध्ये शहीद झालेले लान्स नाईक चंद्रशेखर हरबोला (बॅच क्रमांक 5164584) यांचा मृतदेह तब्बल 38 वर्षानंतर सापडला आहे. 13 ऑगस्ट रोजी एका जुन्या बंकरमध्ये हरबोला यांचा मृतदेह सापडला. सोमवारी किंवा मंगळवारी त्यांचे पार्थिव हल्द्वानी येथील घरी पोहोचेल.

लान्स नाईक चंद्रशेखर हे त्या टीमचा भाग होते, ज्यांना पॉइंट 5965 कॅप्चर करण्याचे काम देण्यात आले होते. त्यावर पाकिस्तानची नजर होती. ऑपरेशन मेघदूत दरम्यान अनेक सैनिकांना हिमस्खलनाचा फटका बसला होता. यापैकी अनेकांचे अवशेष यापूर्वीच सापडले होते पण, चंद्रशेखर हरबोला आणि एका जवानाचा मृतदेह सापडला नव्हता. तो आता तब्बल 38 वर्षांनंतर सापडला आहे.

13 ऑगस्ट रोजी मृतदेह सापडला ऑपरेशन मेघदूतमध्ये टीमचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट पीएस पुंडिर यांच्यासह 18 भारतीय लष्कराचे जवान शहीद झाले होते. यापूर्वी 14 जवानांचे मृतदेह सापडले, तर पाच बेपत्ता आहेत. यापैकी लान्स नाईक चंद्रशेखर हरबोला यांचा मृतदेह 13 ऑगस्ट रोजी सियाचीनमध्ये 16,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर एका बंकरमध्ये सापडला आहे. त्यांच्या शरीराचा आता सांगाडा झाला आहे. अवशेषांसह सैन्य क्रमांक असलेली डिस्कदेखील सापडली, ज्यावरून मृतदेहाची ओळख पटली. ही माहिती ऐकून हरबोलांच्या कुटुंबात दुःख आणि आनंद दोन्ही आहे. 

आजही लोक सैनिकांचे शौर्य विसरलेले नाहीतऑपरेशन मेघदूतमधील जवानांचे शौर्य आणि अदम्य साहस आजही लोक विसरलेले नाहीत. जगातील सर्वात दुर्गम रणांगणावर भारतीय जवानांच्या पराक्रमाची शौर्यगाथा आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. भारतीय लष्कराने 13 एप्रिल 1984 रोजी सियाचीन ग्लेशियरमध्ये ऑपरेशन मेघदूत राबवले होते.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनIndian Armyभारतीय जवानMartyrशहीद