शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

'गुरुत्वाकर्षण लहरींना नरेंद्र मोदींचं नाव द्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 16:26 IST

इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये शास्त्रज्ञांचे एकापेक्षा एक अजब दावे 

जालंधर: लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीत आयोजित करण्यात आलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये एकापेक्षा एक अजब दावे आणि विधानं केली जात आहेत. रावणाकडे 24 प्रकारची विमानं होती आणि त्याच्या काळात श्रीलंकेत विमानतळं होती, असा दावा आंध्र प्रदेश विद्यापीठाचे कुलपती जी. नागेश्वर राव यांनी केला होता. यानंतर आता तमिळनाडूचे शास्त्रज्ञ कनक जगाथला कृष्णन यांनी आणखी एक अजब दावा केला. गुरुत्वाकर्षण लहरींना नरेंद्र मोदींचं नाव देण्यात यावं, असं विधान त्यांनी केलं. के. जे. कृष्णन यांनी इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये एकापेक्षा एक अजब विधानं केली. न्यूटन आणि अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे सिद्धांत पूर्णपणे चुकीचे असल्याचा दावा त्यांनी केला. गुरुत्वाकर्षण लहरींना नरेंद्र मोदींचं नाव देण्यात यावं, असंदेखील ते पुढे म्हणाले. आईन्स्टाईन यांच्या सिद्धांतांवर बोलण्यासाठी कृष्णन यांना कार्यक्रमात बोलावण्यात आलं होतं. मात्र त्यांनी सुरुवातीलाच आईन्स्टाईन आणि न्यूटन यांचे सिद्धांत चुकीचे असल्याचं म्हटलं. 'न्यूटनला गुरुत्वाकर्षणाच्या नियमांची आणि आईन्स्टाईनला सापेक्षतावादाच्या सिद्धांताची पुरेशी माहिती नव्हती. या दोघांची गुरुत्वाकर्षणाबद्दलची समज अतिशय तोकडी होती. त्यामुळे त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत,' असा दावा कृष्णन यांनी केला. आईन्स्टाईननं सापेक्षतावादाच्या सिद्धांतावरुन जगाची दिशाभूल केली, असंदेखील के. जे. कृष्णन म्हणाले. ज्या प्रश्नांची उत्तरं आईन्स्टाईन आणि न्यूटनला देता आली नाहीत, त्यांची उत्तरं माझ्याकडे आहेत, असाही दावा त्यांनी केला. येत्या काळात गुरुत्वाकर्षण लहरी 'नरेंद्र मोदी लहरी' आणि गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव 'हर्षवर्धन प्रभाव' म्हणून ओळखला जाईल, असं कृष्णन म्हणाले. कृष्णन हे तमिळनाडूतील अलिवरमधील कम्युनिटी सर्व्हिस सेंटरमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीscienceविज्ञान