शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

सणासुदीच्या काळात पश्चिम रेल्वेच्या २४ विशेष गाड्या धावणार, आजपासून बुकिंग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 16:03 IST

western railway : या गाड्या पूर्णपणे आरक्षित असतील आणि यासाठी बुकिंग १७ ते २२ ऑक्टोबर दरम्यान असणार आहे.

ठळक मुद्देभारतीय रेल्वेने सणासुदीच्या काळात १९६ जोड्या म्हणजेच ३९२ विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : ऑक्टोबर महिन्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने अधिक विशेष गाड्या (Special Trains) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी दसरा आणि दिवाळी सणानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी १२ जोड्या म्हणजेच २४ विशेष गाड्या चालवल्या जातील. या गाड्यांच्या १५६ फेऱ्या असणार आहेत, असे पश्चिम रेल्वेने (Western Railway) सांगितले आहे. 

पश्चिम रेल्वेने ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, या १२ जोड्या विशेष गाड्यांपैकी ५ जोड्या वांद्रे टर्मिनसहून, २-२ जोड्या इंदूर आणि उधनाहून धावणार आहेत. तर प्रत्येकी १-१ जोड्या ओखा, पोरबंदर आणि गांधीधाम स्टेशनहून धावणार आहेत. रेल्वेच्या माहितीनुसार, या सर्व गाड्या पूर्णपणे आरक्षित असणार आहेत.

१७ ते २२ ऑक्टोबरदरम्यान बुकिंगरेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या सर्व विशेष गाड्यांचे विशेष भाडे असणार आहे. या गाड्या पूर्णपणे आरक्षित असतील आणि यासाठी बुकिंग १७ ते २२ ऑक्टोबर दरम्यान असणार आहे. दरम्यान, यावेळी प्रवासादरम्यान सुरक्षा नियमांचे पालन करावे लागेल.

३९२ फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन दुसरीकडे, भारतीय रेल्वेने सणासुदीच्या काळात १९६ जोड्या म्हणजेच ३९२ विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन ((festival special trains)) म्हणून या विशेष गाड्या धावणार आहेत. दुर्गापूजा, दसरा, छठ पूजा आणि दिवाळीदरम्यान सुट्ट्यांमुळे प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी या विशेष गाड्या कोलकाता, पाटणा, वाराणसी, लखनऊ व इतर ठिकाणी चालविण्यात येणार आहेत. या  फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन २० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर यादरम्यान धावणार आहेत. 

टॅग्स :western railwayपश्चिम रेल्वेrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेDiwaliदिवाळीDasaraदसरा