शहरं
Join us  
Trending Stories
1
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
2
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
3
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
4
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
5
भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...
6
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
7
Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
8
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
9
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
10
"अजित पवारांनी २५ वर्षे ही माहिती का दडवली?", ३१०  कोटींच्या प्रकल्पावरून एकनाथ खडसे यांनी घेरले, गंभीर मुद्द्यांवर बोट
11
मकरसंक्रांतीच्या दिवशीच दुर्दैवी घटना; चायनीज मांजाने गळा कापल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
12
"विराट आणि रोहित सतत गौतम गंभीरशी..."; टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने सगळंच सांगून टाकलं!
13
मुंबई मनपामध्ये भाजपापेक्षा स्ट्राईक रेट चांगला असल्यास महापौरपदावर दावा करणार का? शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले...
14
Affordable Cars: कमी पगार असूनही खरेदी करू शकता 'या' ५ स्वस्त आणि मस्त कार!
15
KL Rahul Century : स्टायलिश बॅटर केएल राहुलची क्लास सेंच्युरी! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
विजय केडिया यांची मोठी गुंतवणूक, या स्मॉलकॅप स्टॉकवर लावला तगडा डाव; खरेदी केले १००००००० शेअर
17
Makar Sankranti 2026: संक्रांतीच्या संध्याकाळी तुळशीजवळ करा 'हे' २ छोटे उपाय; वर्षभर राहील लक्ष्मीची कृपा!
18
पालक पनीर गरम केल्याने राडा; युनिव्हर्सिटीला २ भारतीय विद्यार्थ्यांना द्यावे लागले १.८ कोटी
19
US-इराण लढाईत पाकिस्तान अडकला, ३ संकटांनी घेरलं; असीम मुनीर यांनी बोलावली तातडीची बैठक
20
धुळ्यात हजारो मतदान कार्डांचा साठा सापडला; एमआयएमचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रोल, कॅमेरा, ॲक्शन... रेल्वेची कमाई एकदम जंक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 06:09 IST

शूटिंगमधून मध्य रेल्वेला मिळाला दोन कोटींहून अधिक महसूल

मुंबई : मध्य रेल्वेच्या स्थानकांना चित्रपट निर्माते नेहमीच पसंती देतात. यंदा मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर  १४ चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले. या चित्रीकरणातून २.३६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रीकरणामध्ये ८ फीचर फिल्म्स, ३  वेबसीरिज, एक डॉक्युमेंटरी, एक शॉर्ट फिल्म आणि जाहिरातीसह सुमारे १४  चित्रपटांचा समावेश आहेत.

मध्य रेल्वेने सर्वाधिक १.२७ कोटी रुपयांचा महसूल ‘२  ब्राइड्स’ या चित्रपटाद्वारे मिळवला आहे.  कान्हेगाव स्थानकावर विशेष गाडीद्वारे  १८  दिवसांच्या शूटिंग माध्यमातून तसेच आपटा रेल्वेस्थानकावर तीन दिवसांसाठी विशेष ट्रेनच्या  शूटिंगद्वारे २९.४० लाख महसूल प्राप्त केला आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२२ मध्ये चित्रपटाच्या शूटिंगद्वारे मध्य रेल्वेने रुपये २.३२ कोटी केलेली कमाई ही, गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे.

सीएसएमटी हे चित्रपट निर्मात्यांसाठी सर्वाधिक पसंतीचे चित्रपट शूटिंग स्थान आहे, सनफिस्ट मॉम्स मॅजिकच्या जाहिरात चित्रपटासह ५ चित्रपटांचे चित्रीकरण या युनेस्कोच्या जागतिक वारसा रेल्वेस्थानकावर करण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागातून चित्रपटाच्या शूटिंगला परवानगी दिली जाते. अलीकडेच शूटिंगच्या परवानगीला गती देण्यासाठी सिंगल विंडो सिस्टीम सुरू करण्यात आली आहे.

आतापर्यंत झालेली चित्रीकरणेस्लम डॉग मिलेनियर, कमिने, रब ने बना दी जोडी, रा-वन, रावन, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता है, दबंग, दरबार, रंग दे बसंती, बागी, खाकी, प्रेम रतन धन पायो आणि इतर अनेक हिट चित्रपटांचे मध्य रेल्वेवर चित्रीकरण झाले आहेत.

निर्मात्यांची आवडती ठिकाणे     पनवेलजवळील आपटा स्टेशन     पुणे - कोल्हापूर मार्गावरील वाठार स्टेशन     माथेरान, परळमधील सेंट्रल रेल्वे स्पोर्ट्स अकॅडमी कॉम्प्लेक्स     दादर, कर्जत, जुनी वाडीबंदर     अहमदनगरमधील येवला, मनमाड आणि कान्हेगाव स्टेशन     अहमदनगर आणि आष्टी दरम्यान नवीन विभागातील नारायण डोहो यासारखे यार्ड 

टॅग्स :railwayरेल्वे