शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

PM मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक; 12,343 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 22:03 IST

अन्नपदार्थ, खते, कोळसा, लोखंड, पोलाद, चुनखडी इत्यादींच्या वाहतुकीसाठी हे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत.

Indian Railways: Cabinet Decisions: देशभरातील रेल्वे मार्गावरील गर्दी दूर करण्यासाठी आणि वाहतूक वाढवण्यासाठी मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत भारतीय रेल्वेच्या सहा मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांद्वारे रेल्वे ट्रॅकवर रेल्वे प्रवास अधिक चांगला करण्यात मदत होईल, लॉजिस्टिक खर्च कमी लागेल, तेल आयात कमी होईल आणि प्रदूषणालाही आळा घातला जाईल. शिवाय, अन्नपदार्थ, खते, कोळसा, लोखंड, पोलाद, फ्लायश, क्लिंकर, चुनखडी, पीओएल यांच्या वाहतुकीसाठी हे रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचे आहेत. 

12,343 कोटी रुपयांना मंजुरी सीसीईए (आर्थिक प्रकरणांवरील कॅबिनेट समिती) ची बैठक गुरुवारी 8 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत रेल्वे मंत्रालयाच्या 6 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी 12,343 कोटी रुपये खर्च येणार आहेत. या प्रकल्पांचा संपूर्ण निधी केंद्र सरकार करणार आहे. भारतीय रेल्वेच्या सर्वात व्यस्त विभागांवरील मल्टी-ट्रॅकिंग प्रस्तावामुळे रेल्वे रुळांवर होणारी गर्दी कमी करण्यात आणि कामकाजात सुधारणा होण्यास मदत होईल. मल्टी ट्रॅकिंगमुळे मालवाहतुकीत मोठी वाढ होईल.

6 राज्यांमध्ये प्रकल्पसरकारने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून म्हटले की, या 6 मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांमध्ये 6 राज्ये राजस्थान, आसाम, तेलंगणा, गुजरात, आंध्र प्रदेश आणि नागालँडमधील 18 जिल्ह्यांचा समावेश असेल, ज्यामुळे विद्यमान रेल्वे नेटवर्कमध्ये 1020 किलोमीटरची भर पडेल आणि 3 कोटी लोकांना रोजगारही मिळू शकेल.

हे प्रकल्प PM गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीसाठी तयार केले जातील, जेणेकरुन प्रवासी आणि लॉजिस्टिक वाहतूक अखंडपणे करता येईल. ज्या विभागांमध्ये मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांवर काम केले जाईल, त्यामध्ये राजस्थानातील अजमेर - चंदेरिया, जयपूर - सवाई माधोपूर, गुजरात - राजस्थानमध्ये लुनी-समदारी-भिलडी, असममध्ये अगथोडी - कामाख्या, असम - नगालँडमध्ये लमडिंग - फुरकेटिंग आणि तेलंगाना - आंध्र प्रदेशमध्ये मोटूमारी आणि विष्णुपुरम सामील आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव