शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
3
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
4
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
5
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
6
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
7
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
8
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
9
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
10
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
11
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
12
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
13
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
14
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
15
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
16
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
17
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा
18
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
19
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
20
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; सर्व गाड्यांमध्ये CCTV कॅमेरे बसवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 19:43 IST

Indian Railway: देशभरातील ७४००० डबे अन् १५००० लोकोमोटिव्हचे नूतनीकरण होणार.

Indian Railway:रेल्वे ही भारताची जीवनवाहिनी आहे. दररोज कोट्यवधी लोक या रेल्वेने  प्रवास करतात. या प्रवाशांची सुरक्षितता अधिक मजबूत करण्यासाठी भारतीय रेल्वेने सर्व गाड्यांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत, देशभरातील सुमारे ७४,००० प्रवासी कोच आणि १५,००० लोकोमोटिव्ह इंजिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक कोचमध्ये चार कॅमेरे बसवले जातील, तर प्रत्येक लोकोमोटिव्हमध्ये सहा कॅमेरे बसवण्याची योजना आहे. कोचमधील एंट्री गेट आणि कॉमन एरियामध्ये दोन कॅमेरे बसवले जातील. या हाय-टेक कॅमेऱ्यांची खास गोष्ट म्हणजे, ते कमी प्रकाशातही उच्च दर्जाचे रेकॉर्डिंग करू शकतात आणि जास्त वेगाने स्पष्ट फुटेज देऊ शकतात. यामुळे पाळत ठेवण्याची व्यवस्था आणि सुरक्षिततेत मोठ्या प्रमाणात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

पानिपतमध्ये ट्रेनमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कारकाही दिवसांपूर्वीच पानिपतमध्ये एका ट्रेनमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. महिलेने सांगितले की, ती रेल्वे स्टेशनवर बसली होती. या दरम्यान एका माणसाने येऊन दावा केला की, त्याला महिलेच्या पतीने पाठवले आहे. तो आरोपी महिलेला रिकाम्या कोचमध्ये घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आणखी दोन जण आले आणि त्यांनीही महिलेवर बलात्कार केला. यानंतर तिला रेल्वे ट्रॅकवर फेकून आरोपींनी पळ काढला. महिला रेल्वे ट्रॅकवर पडली असता, तिच्या अंगावरुन एक ट्रेन गेली. या अपघातात तिला तिचा एक पायही गमवावा लागला. या घटनेनंतर, आता कोचमध्ये कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रत्येक स्टेशनवर कॅमेरे बसवले जातीलरेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितले होते की, भारतीय रेल्वे महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक पावले उचलत आहे. देशाच्या विविध भागांतील रेल्वे स्टेशनवर कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे. दीड वर्षात देशातील प्रत्येक रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. प्रत्येक विभाग, झोन आणि रेल्वे बोर्डात वॉर रूम उभारण्यात आल्या आहेत, जे नियमितपणे रेल्वे स्टेशनचे निरीक्षण करतात.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेcctvसीसीटीव्हीAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवCentral Governmentकेंद्र सरकार