शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे विकणार ‘पडीक’ १२ हजार एकर जमीन, राज्यांना दिला प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 02:24 IST

रेल्वेमार्ग टाकण्यासाठी संपादित केलेली परंतु योजना बदलल्याने कित्येक वर्षे वापराविना पडून असलेली १२,०६६ एकर जमीन रेल्वे खात्याने आता विकायला काढली आहे. रेल्वेने या जमिनी जेथे आहेत त्या १३ राज्यांच्या सरकारांना विकासकामांसाठी हव्या असल्यास तसे प्रस्ताव पाठविण्यास सांगितले.

नवी दिल्ली  - रेल्वेमार्ग टाकण्यासाठी संपादित केलेली परंतु योजना बदलल्याने कित्येक वर्षे वापराविना पडून असलेली १२,०६६ एकर जमीन रेल्वे खात्याने आता विकायला काढली आहे. रेल्वेने या जमिनी जेथे आहेत त्या १३ राज्यांच्या सरकारांना विकासकामांसाठी हव्या असल्यास तसे प्रस्ताव पाठविण्यास सांगितले.रेल्वे मंडळाने गेल्या महिन्यात प. बंगाल, गुजरात, तामिळनाडू, झारखंड, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ आणि आसाम या राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या जमिनी कुठे कुठे उपलब्ध आहेत हे कळविले असून त्यांना या जमिनी विकासकामांसाठी हव्या असतील तर त्या एक तर विकत घेण्याचा किंवा अदलाबदली करून घेण्याची आॅफर दिली आहे.रेल्वे मंडळाचे हे पत्र म्हणते की, राज्य सरकारे रेल्वेच्या या जमिनींचा वापर महामार्ग व रस्तेबांधणी किंवा अन्य सार्वजनिक विकासकामांसाठी करू शकतील. राज्यांना या जमिनी विकत हव्या असतील तर प्रचलित बाजारभावाने त्यांचे राज्यांना हस्तांतरण केले जाईल. रेल्वेला उपयुक्त ठरेल अशी जमीन देऊन त्या बदल्यातही राज्य सरकार रेल्वेची जमीन घेऊ शकेल.रेल्वेचे जाळे सर्वदूर पसरविण्यास रेल्वेने मध्यंतरी देशभर सर्व रेल्वेमार्ग सारख्याच गेजचे (रुंदीचे) करण्याचे ठरविले. आता रेल्वे देऊ करीत असलेल्या बहुतांश जमिनी या अशा गेज परिवर्तनासाठी संपादित केलेल्या आहेत.पत्रात उपलब्ध जमिनींचा जो तपशील दिला आहे त्यावरून यापैकी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व आसाममधील काही जमिनी गेल्या १०० वर्षांहून अधिक काळ रेल्वेकडे वापराविना पडून असल्याचे दिसते.उदा. उत्तर प्रदेशात दुधवा-चंदन चौकी या भागातील रेल्वेमार्ग ब्रॉडगेज करण्यासाठी रेल्वेने सन १८९३ मध्ये जमीन संपादित केली व ते काम पूर्ण झाल्यावर १२९ एकर अतिरिक्त जमीन वापराविना पडून आहे. तसेच आसाममध्ये अशाच प्रकारे १८९४ मध्ये संपादित केलेली व आता वापरात नसलेली ४२ एकर जमीन उपलब्ध आहे. अशा प्रकारे या तीन राज्यांमध्ये मिळून सुमारे ५०० एकर रेल्वेला नको असलेली जमीन आहे.हजारो कोटींची कमाईया सर्व जमिनी राज्य सरकारांनी खरोखरच घेतल्या तर त्यातून रेल्वेला हजारो कोटी रुपयांची कमाई होईल, असे सूत्रांनी सांगितले. यापैकी कोणत्या जमिनींमध्ये राज्य सरकारांना स्वारस्य असेल तर त्यांनी त्यांचे प्रस्ताव संबंधित विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे पाठवावेत, असे रेल्वे मंडळाने त्यांना कळविले आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारतGovernmentसरकार