शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
3
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
4
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
5
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
6
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
7
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
8
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
9
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
10
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
11
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
12
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
13
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
14
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
15
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
16
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
17
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
18
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
19
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

रेल्वेची नवी सुविधा; धावत्या ट्रेनमधलं सामान चोरल्यास तात्काळ करता येणार FIR

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 20:02 IST

भारत सरकारनं कोट्यवधी रेल्वे प्रवाशांना मोठं गिफ्ट दिलं आहे.

नवी दिल्लीः भारत सरकारनं कोट्यवधी रेल्वे प्रवाशांना मोठं गिफ्ट दिलं आहे. या रेल्वेतून प्रवासादरम्यान आपलं सामान चोरी झाल्यास तुम्हाला लागलीच एफआयआर दाखल करता येणार आहे. 10 ऑक्टोबरपासून प्रवाशांना या सुविधेचा फायदा उचलता येणार आहे. जीआरपीनं यासाठी एक खास ऍप तयार केलं आहे. धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांबरोबर नेहमीच सोनसाखळी चोरी आणि सामान चोरीच्या घटना घडतात. विशेष म्हणजे जेव्हा ट्रेन हळूहळू स्टेशन सोडते तेव्हाच हे प्रकार केले जातात. अशातच पीडित जोपर्यंत चेन खेचतो तोपर्यंत चोर लांब निघून गेलेला असतो. त्यामुळे आता स्टेशनवर उतरून रिपोर्ट दाखल करण्याऐवजी लागलीच रेल्वेमध्येच एफआयआर दाखल करता येणार आहे. दिल्ली जीआरपीला समजलं प्रवाशांचं दुःखसरकारी रेल्वे पोलिसां(जीआरपी)नी प्रवासी आणि त्यांचं सामान सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तेच पाहता जीआरपी सहप्रवाशांच्या नावे एक ऍप लाँच करणार असून, ते 10 ऑक्टोबरपासून वापरता येणार आहे. या ऍपच्या माध्यमातून धावत्या रेल्वेमध्ये एखादा चोरीचा प्रसंग घडल्यास ट्रेन न थांबवता मोबाइल ऍपच्य माध्यमातून एफआयआर दाखल करता येणार आहे. तसेच जीआरपीनं केलेल्या सहकार्याचा अनुभवही प्रवासी या ऍपवर नोंदवू शकतात. एफआयआर दाखल करण्यासाठी दोन तास थांबवली ट्रेनशान-ए-पंजाब एक्स्प्रेस ही एफआयआर दाखल करण्यासाठी दोन तास थांबवण्यात आली होती. ट्रेन नवी दिल्लीतल्या रेल्वे स्टेशनवरून निघाली, तसेच प्रवाशानं चेन खेचली. त्यामुळे इतर प्रवासी नाराज झाले असून, प्रवाशांची झालेल्या चोरीचं एफआयआर दाखल केल्यानंतर ट्रेन पुढे सोडण्यात आली. या सर्व प्रकारात ट्रेन दोन तास खोळंबली होती, एफआयआर दाखल केल्यानंतर ती रवाना झाली.  

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासी