शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेनं तिकीट बुकिंगचा नियम बदलला, आता आधारशिवाय बुक होणार नाही तत्काळ तिकीट; १ जुलैपासून लागू होणार नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 18:04 IST

Indian Railway : तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही एक एक्स पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली होती. आता रेल्वे मंत्रालयाने एक परिपत्रक जारी केले आहे.

भारतीय रेल्वेने तत्काळ तिकिट बुकिंगच्या नियमात मोठा बदल केला आहे. आता आपल्याला आधार कार्ड आणि ओटीपीशिवाय तत्काळ तिकिट बुक करता येणार नाही. १ जुलै २०२५ पासून तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी आधार आधारित ओटीपी आवश्यक असणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. अर्थात आपले आयआरसीटीसी (IRCTC) खाते आधारशी लिंक नसेल, तर १ जुलैपासून आपल्याला तत्काळ तिकिटे बुक करता येणार नाही.

तत्काळ तिकीट बुकिंगचा नवा नियम असा - रेल्वे मंत्रालयाने, आधार प्रमाणीकरणाशिवाय तत्काळ तिकिटांचे बुकिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवीन नियम १ जुलैपासून लागू होईल. यानंतर, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार कार्ड अनिवार्य असेल, असे असे रेल्वेने म्हटले आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही एक एक्स पोस्ट करत दिली होती माहिती -तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही एक एक्स पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली होती. आता रेल्वे मंत्रालयाने एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार, १ जुलै २०२५ पासून, केवळ आधार व्हेरिफाइड युजर्स आयआरसीटीसी वेबसाइट अथवा अॅपद्वारे तिकिटे बुक करू शकतील. यानंतर, १५ जुलैपासून, तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरण अनिवार्य केले जाईल.

असं करा आधार लिंक -  यासाठी, सर्वप्रथम IRCTC च्या वेबसाइटवर जाऊन लॉगइन करा.आपले युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा. 'My Account' मध्ये जाऊन  'Link Your Aadhaar' ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर, आपला आधार क्रमांक आणि नाव टाका.  यानंतर, रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर आलेला OTP टाकून नंतर सब्मिट म्हणा... 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIRCTCआयआरसीटीसीpassengerप्रवासीAdhar Cardआधार कार्ड