शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railway: बिहारमध्ये चक्क रेल्वे ट्रॅक चोरीला, तब्बल दोन किमीच्या ट्रॅकवर चोरट्यांचा डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 07:58 IST

Indian Railway: तब्बल दोन किलोमीटरचा लोहमार्ग चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क रेल्वेमार्गच चोरीला गेल्याची माहिती समोर येताच विभागीय रेल्वे व्यवस्थापनामध्ये खळबळ उडाली आहे.

पाटणा - बिहारमधील समस्तीपूर रेल्वे मंडळामध्ये इंजिनाच्या स्क्रॅपला विकण्याचा प्रकार समोर आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पंडोल येथून लोहट साखऱ कारखान्याकडे गेलेल्या रेल्वेमार्गातील दोन किलोमीटरचा लोहमार्ग चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क रेल्वेमार्गच चोरीला गेल्याची माहिती समोर येताच विभागीय रेल्वे व्यवस्थापनामध्ये खळबळ उडाली आहे.रेल्वेने या प्रकरणातील झंझारपूरच्या आऊटपोस्टचे प्रभारी आणि मधुबनीच्या जमादाराला निलंबित करण्यात आले आहे. आता या प्रकरणी चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. 

समस्तीपूर रेल्वे विभागातील पंडोल स्टेशनमधून लोहट साखर कारखान्यासाठी अनेक वर्षांपूर्वी पूर्व मध्य रेल्वेने लोहमार्ग बांधला होता. हा साखर कारखराना बंद झाल्यानंतर या मार्गावरून रेल्वे गाड्यांची ये जा बंद झाली होती. या रेल्वे मार्गाचे स्क्रॅप म्हणून लिलाव करण्यात येणार होते. मात्र या लिलावापूर्वीच पंडोल स्टेशनवरून लोहट साखर कारखान्यापर्यंत जाणारा दोन किमीपर्यंतचा मार्ग चोरी झाला आहे. 

दरम्यान, काही रेल्वे कर्मचाऱ्यांनी कटकारस्थान रचून रेल्वे मार्गावरील स्क्रॅप गायब केल्याचा आरोप लोकांनी केले आहे. प्राथमिक तपासानंतर आरपीएफ कमांडेंट एसजे ए जानी यांनी झंझारपूर स्टेशनचे आऊटपोस्ट प्रभारी श्रीनिवास आणि मधुबनी स्टेशनवर तैनात असलेले आरपीएफ जमादार मुकेश कुमार सिंह यांना निलंबित केले आहे. आरपीएफने दरभंगामध्ये रेल्वे मार्ग चोरी प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

समस्तीपूर रेल्वे विभागाने दोन किमीपर्यंत स्क्रॅप रेल्वेमार्ग चोरीला गेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. रेल्वे व्हिजिलेंस (सीआयबी) आणि आरपीएफची टीम यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेCrime Newsगुन्हेगारी