शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांनी एकमेकांना 'पागल' अन् 'मेंटल' म्हणू नये, आयपीएसची ECकडे पत्राद्वारे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 13:33 IST

निवडणूक प्रचारात विरोधकांसाठी सर्रासपणे वापरण्यात येणाऱ्या 'वेडा', 'पागल', 'मेंटल' या शब्दांवर आयपीएसने आक्षेप घेतला आहे.

ठळक मुद्देचारात वापरण्यात येणाऱ्या  'वेडा', 'पागल', 'मेंटल' या शब्दांवर मनोचिकित्सक सोसायटीने आक्षेप घेतला आहे. राजकारण्यांना निवडणूक प्रचारात या शब्दांचा वापर करण्यापासून रोखावे, अशी मागणी आयपीएसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आयपीएसचे अध्यक्ष डॉ. बी. एन. रवीश आणि डॉ. सुरेश बाडा यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहून याबाबत तक्रार केली आहे.

हैदराबाद - निवडणूक प्रचारात विरोधकांसाठी  'वेडा', 'पागल', 'मेंटल' हे शब्द अनेकदा वापरले जातात. नेत्यांनी एकमेकांना 'पागल' अन् 'मेंटल' म्हणू नये यासाठी मनोचिकित्सक सोसायटीने निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. प्रचारात वापरण्यात येणाऱ्या  'वेडा', 'पागल', 'मेंटल' या शब्दांवर मनोचिकित्सक सोसायटीने (आयपीएस) आक्षेप घेतला आहे. हे शब्द मनोरुग्णांचे अवमान करणारे असून अमानवीय आहेत. त्यामुळे राजकारण्यांना निवडणूक प्रचारात या शब्दांचा वापर करण्यापासून रोखावे, अशी मागणी आयपीएसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

आयपीएसचे अध्यक्ष डॉ. बी. एन. रवीश आणि डॉ. सुरेश बाडा यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहून याबाबत तक्रार केली आहे. राजकारणी निवडणूक प्रचारात विरोधकांसाठी 'मेंटल' किंवा 'वेडा' या शब्दांचा वापर करतात. हे शब्द मनोरुग्णांचा अवमान करणारे असून अमानवीय आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात 'मानसिक अस्थिर', 'वेडा' किंवा 'मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करा', आदी शब्द प्रयोग करणे चुकीचे असून त्यावर प्रचारामध्ये लगाम घालण्यात यावा, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. 

राजकारण्यांवर सामाजिक जबाबदारी असते. नेत्यांचं प्रत्येक वक्तव्य, भाषण वर्तमानपत्रांसह वृत्तवाहिन्यांवर कव्हर केलं जातं. त्यामुळे नेत्यांनी जबाबदारीने वक्तव्य केलं पाहिजे. निवडणूक आयोगाने या संबंधाने काही निर्देश जारी करायला हवेत, असंही या पत्रात सांगण्यात आले आहे. 17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात होणार असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. 

मतदानाच्या 48 तास आधी जाहीरनामा प्रसिद्धीस मज्जावनिवडणूक आयोगाने मतदानाच्या 48 तास आधी पक्षांनी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करू नये असे शनिवारी (16 मार्च) स्पष्ट केले होते. निवडणूक आयोगाने आता जाहीरनामा प्रसिद्ध करणे हा आचारसंहितेचाच एक भाग केला आहे. एका किंवा अनेक टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असल्यास जाहीरनामा प्रतिबंधात्मक कालावधीत प्रसिद्ध करू नये, असे सुधारित आचारसंहितेमध्ये म्हटले आहे. कोणत्याही टप्प्यात निवडणूक असली, तरी त्याच्या आधी 48 तास राजकीय पक्षांनी जाहीरनामे सादर करू नयेत, अशा अर्थाचं एक पत्र सर्व पक्षांना निवडणूक आयोगाने पाठवलं आहे. पूर्वीच्याच नियमाचा हा भाग असल्याचं स्पष्ट करत आयोगाने जाहीरनामे प्रचाराचा काळ संपल्यानंतर जाहीर करू नयेत, असं सांगितलं आहे. हा आचारसंहितेचाच एक भाग आहे. भारतीय जवानांचे फोटो प्रचारात वापरू नका; निवडणूक आयोगाची सक्त ताकीद

कोणत्याही राजकीय पक्षांनी संरक्षण दलातील कोणत्याही व्यक्तीचे छायाचित्र निवडणूक प्रचारामध्ये न वापरण्याची सक्त ताकीद निवडणूक आयोगाने दिली आहे. शनिवारी (9 मार्च) निवडणूक आयोगाची एक बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये प्रचारादरम्यान सैन्याचा वापर करू नका अशी ताकीद निवडणूक आयोगाने देशातील विविध राजकीय पक्षांना दिली. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचे एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले होते. संरक्षण विभागातील व्यक्तींची छायाचित्रे विविध पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांकडून आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान वापरले जात असल्याबाबतची माहिती संरक्षण विभागाने निवडणूक आयोगाला दिली. याप्रकरणी राष्ट्रीय आणि स्थानिक पक्षांना योग्य सूचना देण्याची विनंती संरक्षण विभागाकडून करण्यात आली होती. त्यानुसार निर्देश देण्यात आल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले असल्याचे निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले होते. तसेच सशस्त्र दल देशाच्या सीमा, राजकीय यंत्रणा आणि नागरिकांच्या संरक्षणाची महत्त्वाची भूमिका बजावत असतात.त्यामुळे सशस्त्र दलांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा वापर निवडणूक प्रचारादरम्यान करण्यात येऊ नये, असेही आयोगाने नमूद केले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग