शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Prashant Kishore Congress : २०२४ चा प्लॅन तयार; राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांना काँग्रेसकडून ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 16:03 IST

Prashant Kishore Congress : प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला २०२४ च्या निवडणुकीचे तपशीलवार सादरीकरण दिले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Prashant Kishore Congress : २०१४ आणि २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी निराशाजनकच राहीली आहे. दरम्यान, आता काँग्रेसनं २०२४ च्या निवडणुकांची तयारी सुरू केली असून राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांना मोठी ऑफर दिली आहे. प्रशांत किशोर यांना पक्षात सामील होण्यास तसंच सल्लागार म्हणून काम करण्यास काँग्रेसनं सांगितलं असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. 

प्रशांत किशोर यांनीदेखील यात स्वारस्य दाखवलं असून पक्षाच्या कमकुवत बाजूंवर तपशीलवार सादरीकरणही केलं. तसंच सुधारणांसाठी कोणत्या बाबींची आवश्यकता आहे, याची माहितीही त्यांनी दिल्याचं सूत्रांनी म्हटलं. एनडीटीव्ही इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलंय. किशोर यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी तपशीलवार सादरीकरणदेखील केलं आहे, याशिवाय त्यांच्या सूचना आणि कल्पनांवर अभ्यास करण्यासाठी आणि ते पुढे कशा राबवाव्या यासाठी एक छोटी समिती स्थापन करण्यात येणार आहे अशी माहिती प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांनी दिली.दरम्यान, ही बैठक या वर्षाच्या अखेरिस असलेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकांसाठी नसल्याची माहिती प्रशांत किशोर यांच्या नजीकच्या सूत्रांनी दिली. काँग्रेस नेतृत्व आणि प्रशांत किशोर मुख्यत्वे २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकांवर चर्चा करत असल्याचं त्यांनी सांगितलं. २०२४ बाबात एका निश्चित निर्णयावर पोहोचल्यानंतर गुजरात किंवा अन्य राज्यांमध्ये निवडणुका प्रशांत किशोर यांची नियुक्ती आणि जबाबदारीच्या अनुषंगानं होतील, असंही सूत्रांनी सांगितलं.शनिवारी काँग्रेसनं बोलावलेल्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी गांधी कुटुंबीयांची भेट घेतली. या बैठकीला काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, एके अँटनी, अंबिका सोनी, जयराम रमेश, मुकुल वासनिक, दिग्विजय सिंह आणि अजय माकन हेदेखील पोहोचले होते. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसElectionनिवडणूक