Indian Passport: डिजिटल इंडियाच्या दिशेने आपल्या देशाची वेगाने प्रगती होत आहे. आता भारतीयांचा प्रवास आधुनिक आणि सुरक्षित करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने ई-पासपोर्ट सुविधा सुरू केली आहे. भारताच्या विदेश मंत्रालयाने नागरिकांसाठी ई-पासपोर्टची सुविधा सुरु केली आहे. हा पायनियर प्रोजेक्ट एप्रिल 2024 मध्ये पायलट स्वरूपात सुरू झाला होता आणि आता जून 2025 पासून देशभरात लागू केला गेला आहे.
ई-पासपोर्ट म्हणजे काय?
ई-पासपोर्ट पारंपरिक पासपोर्टसारखाच असतो, पण त्यात आधुनिक तंत्रज्ञान जोडले आहे.
कव्हरमध्ये RFID चिप आणि अँटेना असतो.
यामध्ये युजरची बायोमेट्रिक माहिती, जसे फिंगरप्रिंट आणि डिजिटल फोटो सुरक्षित ठेवली जाते.
यामुळे बनावट पासपोर्ट बनवणे जवळजवळ अशक्य आहे.
कव्हरवर “Passport” शब्दाखाली सोनेरी चिन्ह असते, जे पासपोर्ट ओळखण्यास मदत करते.
हा पासपोर्ट ICAO आंतरराष्ट्रीय मानकांनुसार प्रमाणित आहे, त्यामुळे जगभरात मान्यता प्राप्त आहे.
कोणत्या केंद्रांवर उपलब्ध?
सुरुवातीला हे केंद्र फक्त चेन्नई, हैदराबाद, भुवनेश्वर, सूरत, नागपूर, गोवा, जम्मू, शिमला, रायपूर, अमृतसर, जयपूर, रांची आणि दिल्ली येथे उपलब्ध होते.
आता पासपोर्ट सेवा प्रोग्राम 2.0 अंतर्गत ही सुविधा देशभरात लागू करण्यात आली आहे.
विद्यमान वैध सामान्य पासपोर्ट धारकांना लगेच बदलण्याची आवश्यकता नाही.
अर्ज करण्याची पात्रता
ई-पासपोर्टसाठी पात्रता सामान्य पासपोर्टसारखीच आहे:
कोणताही भारतीय नागरिक अर्ज करू शकतो.
आवश्यक कागदपत्रे: ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, जन्मतारीख पुरावा.
पासपोर्ट सेवा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक वेरिफिकेशन अनिवार्य आहे.
अर्ज प्रक्रिया
पासपोर्ट सेवा पोर्टलवर रजिस्ट्रेशन/लॉगिन करा.
ऑनलाइन फॉर्म भरून नजीकच्या पासपोर्ट सेवा केंद्राची निवड करा.
निर्धारित फी ऑनलाइन भरा आणि अपॉइंटमेंट बुक करा.
ठरलेल्या दिवशी आवश्यक कागदपत्रांसह केंद्रावर पोहचून वेरिफिकेशन करा.
बायोमेट्रिक कॅप्चर नंतर ई-पासपोर्ट जारी केला जाईल.
ई-पासपोर्टचे फायदे
सुरक्षा: चिपमधील डेटा बदलणे किंवा नकली तयार करणे कठीण.
वेगवान प्रक्रिया: एयरपोर्टवरील इमिग्रेशन प्रक्रियेची गती वाढेल, विशेषतः ऑटोमेटेड ई-गेट्स असलेल्या देशांमध्ये.
आंतरराष्ट्रीय मान्यता: भारताचा पासपोर्ट जागतिक मानकांनुसार प्रमाणित.
ओळख सुरक्षितता: इलेक्ट्रॉनिक व बायोमेट्रिक फीचर्स नागरिकांना ओळख चोरीपासून संरक्षण देतात.