नवी दिल्ली- मागील काही दिवसांपासून भारत आणि चीन यांच्या संबंधात तणाव निर्माण झालाय. डोकलामच्या मुद्द्यावरून हा तणाव पराकोटीला गेला होता. चीनबरोबर भारताचे राजनैतिक संबंधही फारसे चांगले नाहीत. अशात चीन सातत्यानं हिंदी महासागरात घुसखोरीचा प्रयत्न करत असतो. परंतु भारताकडूनही चीनला जशात तसे उत्तर मिळते.मंगळवारी जेव्हा हिंदी महासागरात चीनच्या तीन युद्धनौका दिसल्या. त्यावेळी भारतीय नौदलानंही त्यांचं हटके अंदाजात ट्विट करत स्वागत केलं. हिंदी महासागरातल्या भारताच्या हद्दीत चीनच्या 29व्या पायरसी एस्कॉर्ट फोर्सचं स्वागत आहे, हॅपी हंटिंग, असं म्हणत बीजिंगला भारतानं मोठा संदेश दिला आहे. भारतीय नौदलानं केलेल्या स्वागतानं चीनही काहीसा अचंबित झाला.
हिंदी महासागरात दिसल्या चिनी युद्धनौका, भारतीय नौदलानं असं केलं स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 12:47 IST